तारस्ते येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

तळा संजय रिकामे 

तळा तालुक्यातील तारस्ते गावात शिवसेना विधिमंडळ पक्षप्रतोद उपनेते महाडचे कार्यसम्राट आ.भरतशेठ गोगावले यांच्या विशेष प्रयत्नांतून बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाच्या जागेचे भूमीपूजन करण्यात आले.

या भूमिपूजन सोहळ्यासाठी शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर,महीला जिल्हा प्रमुख नीलिमा घोसाळकर, माणगाव नगरपंचायत नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार,माणगाव शहर प्रमुख सुनील पवार,तळा तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ,शहर प्रमुख राकेश वडके, गटनेत्या नगरसेविका नेहा पांढरकामे,जिल्हा कोअर कमेटी सदस्य लीलाधर खातू,महीला तालुका प्रमुख छाया ठमके,संपर्क प्रमुख अॅड.चेतन चव्हाण,नगरसेवक नरेश सुर्वे,भास्कर गोळे,सिराज खाचे, मंगेश पोळेकर,उप तलूका प्रमुख दीपक चींचाळकर,शरद सारगे, युवा तालुका अधिकारी जयवंत राणे,विभाग प्रमुख रमेश तांदळेकर तारस्ते ग्रामस्थ आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.     

                काही महिन्यांपूर्वी तारस्ते गावाने शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला होता यावेळी शिवसेना विधिमंडळ पक्षप्रतोद उपनेते महाडचे कार्यसम्राट आ.भरतशेठ गोगावले यांनी विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही ग्रामस्थांनी कामे सुचवा विकास केला जाईल असे आश्वासन दिले होते या आश्वासनाची पूर्तता आमदार महोदयांनी केली असून ग्रामस्थांच्या मागणी नुसार सामाजिक सभागृहासाठी तब्बल ३० लक्ष रुपये मंजूर केले आहेत याच कामाचे भूमिपूजन काल दि.२६.३.२३ रोजी करण्यात आले.आ.गोगावले काही कामा निमित्त येऊ न शकल्यामुळे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog