मुबंई गोवा महामार्गावरील असलेल्या महिसदरा पुलावरील रस्त्याला जीवघेणे खड्डे 

 सहा महिन्यांपासून दुरुस्ती सुरूच

              कोलाड - श्याम लोखंडे 

मुबंई गोवा महामार्गावरील पुई पेट्रोल पंपाच्या बाजूला  महिसदरा नदीपात्रावर पूल आहे. या पुलाच्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून हे जीवघेणे खड्डे अत्यंत धोकादायक असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांच्या जीवाशी खेळणारे खड्डे असल्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे तर मागील सहा महिन्यांपासून या पुलाचे दोन्ही बाजूचे संरक्षण कठडे दुरुस्तीचे काम सुरूच आहे. अजून त्याची दुरूस्ती किती महिने सुरू राहील? असा संतापजनक सवाल आता प्रवाशी नागरिक करत आहेत .

               खड्ड्यांबाबतीत रायगड जिल्हा अग्रेसर आहे. वास्तविक मुंबई गोवा महामार्गावर असलेले हे खड्डे बळी घेण्याची वाट पाहत आहेत काय ? असा ज्वलंत प्रश्न नागरिकांना पडला आहे. पुई येथील समाजसेवक श्री.निलेशभाई महाडिक यांनी पत्रकारांना सांगितले मुंबई महामार्गावरील हे रस्ते आहेत की खड्ड्यातील रस्ते असा ज्वलंत प्रश्न दरवर्षी रस्त्यावर जे जीवघेणे खड्डे पडतात याला कोणीही जाब विचारत नाही.एकतर पनवेल ते इंदापूर रस्ता रुंदीकरणाचे काम रखडलेले आहे त्यात हे जीवघेणे खड्डे असे किती वर्षे चालणार ? किती जणांचे बळी  घेणार असे सांगून समाजसेवक निलेश महाडिक म्हणाले की,रस्त्यांबाबत सुधारणा न झाल्यास मी स्वतः माझ्या सहकाऱ्यां समवेत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करून उपोषणास बसेन.याबाबत तह‌सिलदार जिल्हाधिकारी यांना रितसर निवेदन देऊन आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले. 

             वास्तविक दहा मिटर पर्यंत पडलेले भलेमोठे खड्डे बुजविण्यास किती वेळ लागणार आहे. मात्र त्याच खड्ड्यात जीव जाण्यास फारसा वेळ लागणार नाही. या जीवघेण्या खड्ड्यांतून प्रवास करणाऱ्या नागरिकांना, तसेच वाहन चालकांना दररोज मोठा त्रास सहन करून रस्ता पार करावा लागत असल्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog