ऑनलाईन रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

रोहा (प्रतिनिधी) : खासदार सुनिलजी तटकरे साहेब, पालकमंत्री आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अध्यक्षा प्रितमताई पाटील यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेसने दिवाळीमध्ये Selfi With Rangoli ह्या संकल्पनेवर आधारित ह्या ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. सुंदर रांगोळ्या रेखाटणार्‍या युवती व महिलांना प्रोत्साहित करणे व त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दुहेरी उद्देशाने, तंत्रज्ञानाचा वापर करुन ह्या स्पर्धा यशस्वीपणे राबविल्या गेल्या.
स्पर्धा फक्त रोहा तालुका मर्यादित असुनही स्पर्धेला युवती व महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. ह्या अभिनव रांगोळी स्पर्धेचा निकाल रोह्याच्या कुंडलिकातटी झालेल्या भव्यदिव्य दिपोत्सव कार्यक्रमात जाहिर होऊन आदरणीय पालकमंत्र्यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले व उत्तम संयोजनाबद्दल युवती अध्यक्षा रविना मालुसरे यांचे कौतुक केले. याविषयी युवती अध्यक्षा रविना मालुसरे यांनी सांगितले की, ह्या कार्यक्रमामुळे आम्हांला मनापासून आनंद झाला. स्पर्धेला तरुणाईने दिलेल्या सहकार्याबद्दल सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार. महिला अध्यक्षा प्रितमताई पाटील ह्यांचे मार्गदर्शन व त्यांची धडपड हेच ह्या स्पर्धेच्या यशाचे गमक आहे.यापुढेही रोहा तालुक्यातील युवती व महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. असेच सहकार्य असु द्या. सर्व विजयी स्पर्धकांचे पुनश्च अभिनंदन.

या कार्यक्रमासाठी पालकमंत्र्यांसमवेत रोहा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,शहरअध्यक्ष अमित पोटफोडे,महिला अध्यक्ष प्रितमताई पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
क्रमांक-सौ.समिक्षा सचिन  मुसळे,आंबेवाडी.
द्वितीय क्रमांक-कु.मनाली मारूती जाधव.सोनगाव.
तृतीय क्रमांक-हर्षदा रूपेश जाधव, धनगर आळी रोहा.
उत्तेजनार्थ चतुर्थ..कु.संस्कृती नंदकुमार मरवडे.तळवली.
उत्तेजनार्थ.पंचम.कु.सौम्या संतोष खडतर.आंबेवाडी.
विजेत्यांना पालकमंञी मा.आदितीताई तटकरे यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे व सन्मानपत्र देण्यात आले. तर सर्व सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात आले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog