कोलाड विभागातील सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान
समाजसेवक निलेशभाई महाडिक यांचा पुढाकार
रोहा अष्टमी- नरेश कुशवाहा
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाचा आरसा आहे समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट सर्व बाबींचे निरीक्षण करून तो वृत्तांकन करुन तो आपली जबाबदारी आपले कर्तव्य पार पाडत असतो पत्रकारांच्या कर्तव्याला आपण ही साथ दिली तर पत्रकारांच्या लेखणीला अधिक ताकद येईल अधिक गती येऊन पत्रकार अधिक निर्भीड होतील यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून कोलाड पुई या गावातील समाजसेवक तसेच महाराज साम्राज्य संघ रायगड जिल्हा अध्यक्ष निलेशभाई महाडिक यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोलाड परिसरातील पत्रकारांचा दिनांक २५ नोव्हेंबर २०२१रोजी त्यांच्या पुई येथील निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात पत्रकार बांधवांना शाल,सन्मान प्रतिमा व पुष्पगुच्छ देत सन्मानित केले.
यावेळी सुतारवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार हरिचंद्र महाडिक,चिल्हे खांब-कोलाड विभागीय पत्रकार रायगड भूषण डॉ.श्याम लोखंडे,गोवे-कोलाड येथील उत्कृष्ट पत्रकार विश्वास निकम, चिंचवली-कोलाड येथील पत्रकार भिवा पवार यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी समाजसेवक निलेश भाई महाडिक म्हणाले की,समाजात आपल्या जबाबदारीचे भान ठेवून निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य असून मी सदैव पत्रकारांच्या सुखदुःखात पाठीशी आहे. यावेळी सुतारवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र महाडिक म्हणाले की,पत्रकार आपले कर्तव्य समर्थपणे पूर्ण करत असतो,तेंव्हा व्यवस्था त्याच्या बाजूने उभी राहील असे नाही, अनेक घटक सुखावतात तर काही घटकांची पत्रकारांना नाराजी ओढवून घ्यावी लागते. ज्यांना स्वतःचा आवाज नाही, त्यांचा आवाज होऊन मूक आवाजाला निर्णयकर्त्या व बहुसंख्यांक पर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार प्रामाणिकपणे करत असतो. अशा पत्रकारांचा सन्मान राष्ट्रीय पत्रकार दिनाचा औचित्य साधून केलेला सत्कार आमच्या प्रामाणिकपणाचा,आमच्या कर्तव्याचा हा सन्मान आहे असे ज्येष्ठ पत्रकार हरिचंद्र महाडिक यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर समाजसेवक निलेशभाई महाडिक, प्राध्यापक आमलपुरे, सूर्यकांत पत्रकार हरिश्चंद्र महाडिक,डॉ.श्याम लोखंडे, विश्वास निकम,भिवा पवार, खेमसिग चव्हाण, प्रसाद खुळे संजय कनघरे,गौरव नाईक, इकींदर शेवाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. समाजसेवक निलेशभाई महाडिक यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment