जुनी पेन्शन संघर्ष समिती आयोजित भव्य पेन्शन संघर्ष सभेस महाड येथे भरघोस प्रतिसाद
जिल्ह्यातील सर्व संघटनांचा एकमुखी पाठिंबा
महाड-प्रतिनिधी
जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती आयोजित भव्य पेन्शन संघर्ष सभा कोटेश्वरी सामाजिक सभागृह महाड जिल्हा रायगड येथे दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती.दि.1नोव्हेंबर 2005 व त्यानंतर नियुक्त सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी रायगड जिल्हा जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकारी व सर्व सभासद एका झेंड्याखाली एकत्र आले होते. विशेष म्हणजे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्व शिक्षक व शासकीय कर्मचारी संघटनांनी जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या मागण्यांसाठी या भव्य पेन्शन संघर्ष सभेत सहभाग घेऊन आपला पाठिंबा दर्शविला.
महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद करून तिला पर्याय म्हणून राज्य सरकारची डीसीपीएस/NPS योजना सुरू केली. कर्मचाऱ्यांच्या वेतनातील रक्कम बाजारात विविध कंपन्यांमध्ये गुंतवून त्यातून कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचे धोरण होते मात्र मागील सोळा वर्षातील डीसीपीएस/NPS योजनेचे स्वरुप बघता ही योजना फसवी असून त्यातून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे निवृत्तीवेतन मिळताना दिसत नाही.त्यामुळे मागील सोळा वर्षात निवृत्त तसेच मयत झालेले असंख्य कर्मचारी व त्यांचे परिवार पेन्शन पासून वंचित असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या सेवेसाठी आपले पूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशी वेळ येणे हे निंदनीय आहे. त्यामुळे दिनांक 31 ऑक्टोबर 2005 नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचे लाभ पूर्ववत लागू करावेत अशी मागणी महाराष्ट्रातील सर्व संघटना मागील पंधरा वर्षांपासून विविध आंदोलने करून करत आहेत. मात्र शासनाने फक्त आश्वासने देऊन वेळोवेळी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. शासनाच्या धोरणाविरुद्ध आता महाराष्ट्रातील सर्व संवर्गीय पदांच्या संघटना एकत्र आल्या असून मुंबई येथे दिनांक 11 ऑगस्ट 2021 ला "जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती " या नावाने वज्रमूठ बांधली गेली. सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ववत जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी त्रिस्तरीय व्यापक लढा उभारण्याचे निश्चित केले.त्यातील पहिला टप्पा म्हणून दिनांक 22 नोव्हेंबर 2021पासुन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातुन पेन्शन संघर्ष यात्रा काढण्याचे निश्चित केले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज दि.26 नोव्हेंबर रोजी महाड येथे रायगड जिल्हा जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या झेंड्याखाली भव्य पेन्शन संघर्ष सभेचे आयोजन केले होते.त्यास मोठ्या संखेने विविध मान्यवर उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने श्री. वितेश खांडेकर राज्य अध्यक्ष जुनी पेन्शन संघटना, तसेच राज्य पदाधिकारी, कोकण विभाग प्रमुख अमोल माने,रायगड जिल्हाध्यक्ष श्री मंदार रसाळ,सर्व जिल्हा कार्यकारणी,जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष,प्रमुख पाहुणे श्री.राजेश सुर्वे (राज्यध्यक्ष म.राज्य शिक्षक परिषद),श्री विजय पवार,श्री वैभव कांबळे,श्री.अजय कापसे(जिल्हा शिक्षण समिती सदस्य),श्री. उमेश विचार(शिक्षक संघ),श्री. जामकर(केंद्र प्रमुख संघटना) व इतर जिल्ह्यातील सर्व संघटनेचे बहुसंख्य सदस्य व जिह्यातील dcps धारक मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.
Comments
Post a Comment