आळंदी-अलंकापुरीत लोटला भाविकांचा जनसागर ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात अनेक पायी दिंड्यां दाखल
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
कोलाड-श्याम लोखंडे
वारी वृत्तांत
'ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पुज्यस्थानी, चिंतकांचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा...' असे म्हणत खांद्यावरील भगव्या पताका उंचावत वैष्णवांची मांदियाळी अनंत काळपासून आळंदी आलंकापुरीत माऊलींच्या संजीवन समाधी दिन पायी दिंडी सह भाविक लाखोंच्या संख्येने या समाधि सोहळ्यासाठी दाखल होत असून कार्तिकी एकादशी निमित्ताने लाखो भाविकांच्या वतीने मोठ्या भक्ती-भावाने माऊलीला प्रदक्षिणा व संजवनी समाधी सोहळ्याकरीता या ठिकाणी स्थानिक पालिका यंत्रणेसह आरोग्य व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
मागील दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे शासकीय निर्बंध असल्याने लाखो वारकरी भक्तगणांच्या वारीत खंड पडला. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेला श्री क्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा शासनाच्या अटी शर्ती नुसार संपन्न होत असलेल्या समाधी सोहळ्याकरीता रविवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने ही संत मंडळी व भाविक दाखल झाले आहेत .
पंढरपुरातील विठ्ठलाच्या पादुकांसह संत नामदेवराय, पुण्डलिकराय यांच्या पालख्या दाखल होणार असून, तर कोकण भागातून ठाणे ,रायगड, रत्नागिरी ,तसेच मुबई,या अनेक जिल्ह्यातून अधिक दिंड्यांचे आगमन झाले आहे,हातात भगव्या पताका कपाळी बुक्का, केसरी गंध, गळ्यात तुलशीच्या माळा अन मुखातून 'ज्ञानोबा-तुकारामा'चा जयघोष टाळ मृदुंगाच्या गजरात लाखो भाविकांची असंख्य पावले आपल्या घरान्यातिल अविरतपणे व परंपरेने चालत आलेली संप्रदायिक वारी माऊलीचरणी समर्पित करण्यासाठी आळंदी अलंकापुरीत येऊन दाखल होत आहेत.नाशिक अहमदनगर,नाशिक औरंगबाद, बिड ,शिरूर,कोकण प्रांतातून कोकण वाशियांचे श्रद्धास्थान गुरुवर्य स्वानन्द सुख निवासी अलिबागकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादने व त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत ठाणे रायगड व रत्नागिरी येथील विविध फडकरी यांच्या प्रेरणेने सर्वाधीक म्हणजे अधिक पायी दिंड्या आळंदीत या संजीवनी समाधि सोहळ्यासाठी दाखल झाल्या आहेत.
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर | मुखी म्हणता चुकतील फेरे || होतील संतांचिया भेटी | सांगू सुखाचिया गोष्टि || आळंदी अलंकापुरीत माऊलीच्या प्रेरणेने संतांची मांदियाळी ने सारी आळंदी अलंकापुरी माऊलीच्या जयघोषात दूम दुमत आहे, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू, संजीवनी समाधी सुख सोहळा डोळे भरून पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी सम्प्रदायिक भाविक व भक्तगण दाखल झाले असून दरम्यान कार्तिकी एकादशी निमित्ताने गेली तीन दिवसांपासूनच पहाटे पासूनच माऊलींच्या दर्शनबारीच्या रांगेतही भाविकांची गर्दी ओसंडून लागली असली तरी कोरोना संसर्ग व निर्बंधांचे पालन करत भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येत आहे मास्क व सॅनिटाईज यांची जनजागृती येथील यंत्रणा करत आहे. महाद्वारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे.या ठिकाणी धातुशोधक यंत्रण बसविण्यात आली आहे. मंदिरासह आळंदीत ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे. तसेच आळंदी नगर परिषदेसह कर्मचारी व पुणे जिल्हा पोलीस यंत्रणा व आरोग्य यंत्रणा देखील या साठी कमालीची सुसज्य झाली असून भाविकांना उत्तम प्रकारे शासकीय यंत्रणेद्वारे सहकार्यातुन सहकार्य करत असून भक्तगणांना माऊलीचे दर्शन घडत आहे .चला आळंदीला जाऊ ,ज्ञानेश्वर डोळा पाहू l होतील संतांचिया भेटी ll प्रवचनकार कीर्तनकार विणेकरी,टाळकरी फडकरी संत मंडळी यांची गळाभेट भेटाभेटीचा अलंकापुरीत देव धर्म समाज मानवता यांची नीती मूल्यांची जोपासना जाणारे म्हणजे भारतीय संस्कृतीतील वारकरी संप्रादय ,मार्ग दाऊनीया गेले आधी l दयानिधी संत ते ll तेणेचि पंथे चालो जाता l न पडे गुंथा कोठे काही ll कोकण वाशियांचे श्रद्धास्थान गुरुवर्य स्वा सुख निवासी अलिबागकर महाराज यांच्या प्रेरणेने गुरुवर्य गोपालबाबा वाजे गुरुवर्य धोंडूबाबा कोल्हटकर यांच्या कृपा आशीर्वादाने कोकण रायगड मधून ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो दिंड्यांचे आळंदी आलंकापुरीत रविवारी दाखल झाल्या आहेत,
भाविकांसाठी दर्शनाची रांग भक्ती सोपान पुलावरून इंद्रायणीनदीच्या पलीकडील दिशेने दिली गेली आहे तर सोशल डिस्टनचा वापर करत मंदिर प्रवेश जाणारे भक्त गण संयम राखत करत आहेत तर काही तासाचा कालावधी समाधी दर्शनादठी लागत आहे सुरक्षेच्या कारणास्तव मोठा बंदोबस्त देऊलवाडा मंदिर परिसरात असून वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र नेमणूक केली आहे.
आळंदीत इंद्रायणीत एक भाविकांच्या स्नान घाटावर देखील स्वतंत्र यंत्रणा व्यवस्था व स्वच्छता राबवली जात आहे . यावर्षात पावसाची सरासरी चांगली झाली इंद्रायणीला पाणी देखील भरपूर आहे मात्र ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी स्थान करतात त्या गरुड स्तंभ ते पुंडलिक मंदिर परिसरात आधीच पाण्याची पातली असल्याने वारकरी भाविकांनी स्नान करण्यासाठी खोलात जाऊ नये अश्या सूचना यंत्रणेकडून देण्यात येत आहेत. गेली तीन दिवस वारकरी आळंदीत दाखल झाले असून या कार्तिकी वारी सोहळ्यासाठी आज एकादशी निमित्ताने तीन ते चार लाखाहून अधिक जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असून मात्र इंद्रायणीत आंघोळीला गेलेल्या भाविकांना डुबकी मारावी लागणार आहे तर माऊलीच्या संजीवनी समाधी सोहळ्यासाठी व दर्शनासाठी भाविकांच्या सेवेसाठी येथील यंत्रणा सज्ज झाली आहे .
Comments
Post a Comment