"आदिशक्ती न्युज" डिजीटल वेब पोर्टलचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या शुभहस्ते लोकार्पण संपन्न

रोहा-प्रतिनिधी

 आदिशक्ती न्युज डिजीटल वेब पोर्टलचे लोकार्पण आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या शुभहस्ते निवी ता.रोहा येथे आज दि.२४ नोव्हेंबर २०२१रोजी संपन्न झाले.

   कु.रविना मालुसरे संपादित ह्या डिजीटल पोर्टल लोकार्पण कार्यक्रमास आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी जेष्ठ नेते विजयराव मोरे,रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील,तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर,पंचायत समिती उपसभापती रामचंद्र सकपाळ,ज्येष्ठ नेते सुरेश मगर, शंकरराव भगत,अप्पा देशमुख,अनिल भगत,अनंत देशमुख,वरसे सरपंच नरेश पाटील,उपसरपंच मामा सुर्वे,हेमंत कांबळे,रामा म्हात्रे,संतोष भोईर,ज्ञानेश्वर साळुंखे,अमित मोहिते,सतिश भगत,कर्णेकर तसेच परिसरातील ग्रामपंचायत सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व निवी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी  कु.रविना मालुसरे यांचे कौतुक केले.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रात वाढला आहे.वेगवान व अचुक बातमी देण्यासाठी ह्या तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करुन अनेक पत्रकार सक्षमपणे पत्रकारीता करीत आहेत.समाजमाध्यमांचा वापर लोकजागृती व ज्ञानवृध्दीसाठी होणे काळाची गरज बनले आहे.हेच ब्रीद घेऊन कु.रविना मालुसरे यांनी हे डिजीटल वेब पोर्टल सुरु केले आहे.कु.रविना मालुसरे ह्या रायगड जिल्ह्यातील कदाचित एकमेव महिला पत्रकार असाव्यात ज्यांनी लहान वयात ही उंची गाठली आहे.ह्या वेब पोर्टल बरोबरच लवकरच आदिशक्ती न्युजचे युट्युब चॕनेल जनतेच्या सेवेसाठी येणार असल्याचे यावेळी कु.रविना मालुसरे यांनी सांगितले.

    रोहा तालुक्याच्या ग्रामीण भागातील मालसई गावच्या विज्ञान शाखेच्या पदवीधर असलेल्या कु.रविना मालुसरे ह्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत बहुआयामी व्यक्तीमत्व आहे.पत्रकारीता क्षेत्रातील त्यांचे कामही वाखाणण्याजोगे आहे.त्यामुळेच निवी ता.रोहा येथील डिजीटल वेब पोर्टल लोकार्पण कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog