जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज सानप यांची महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ रायगड सरचिटणीसपदी निवड
अलिबाग-प्रतिनिधी.
रायगड जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप यांची महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ रायगड जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.रायगड जिल्हा हा मुंबई पासून खुप जवळ आहे.तसेच तो पर्यटन व औद्योगिकीकरणाचे केंद्र म्हणून प्रशिध्द आहे.अशा रायगड जिल्ह्यात मंत्री,वरिष्ठ अधिकारी व अतिमहत्वाच्या व्यक्तींचा सतत राबता असतो.जिल्ह्यात येणाऱ्या VIP व VVIP लोकांच्या कार्यक्रमांची माहिती ठेवणे,प्रसार माध्यमांना सुचित करणे,शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे जनतेत पोहचविणे,शासन/प्रशासन व जनता यामध्ये समन्वय राखणे हि अवघड कामे श्री मनोज सानप अतिशय कौशल्याने करीत आहेत.त्यांच्या ह्या समन्वय कौशल्याचा विचार करुन जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांचावर सोपवली आहे.
दि.22 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार श्री.ग.दि.कुलथे यांच्या अध्यतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली.
या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांची अध्यक्षपदी तर जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांची सरचिटणीसपदी एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी मुख्यालय सह सरचिटणीस सुदाम टाव्हरे, संघटक श्री.रमेश जंजाळ, श्री.बापूसाहेब सोनवणे तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जाहीर करण्यात आलेली रायगड जिल्हा कार्यकारिणी समिती पुढीलप्रमाणे :-
अध्यक्ष- निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, सरचिटणीस- जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप.
उपाध्यक्ष-जिल्हा नियोजन अधिकारी श्री.जयसिंग मेहत्रे, उपायुक्त,पशुसंवर्धन डॉ.सुभाष म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने,कार्यकारी अभियंता,सा.बां.विभाग अलिबाग श्री.जगदीश सुखदेवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद श्री.भगवान घाडगे,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.महेश देवकाते,कार्यकारी अभियंता, सा.बा.वि.महाड आर.के.बामणे, कामगार उपायुक्त श्री.प्रदीप पवार. कार्याध्यक्ष-उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) जि.प.रायगड निलेश घुले,सह कार्याध्यक्ष-जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री.रोशन मेश्राम, कोषाध्यक्ष-डॉ.मनोजकुमार श्रेणिक शेट्ये, सह कोषाध्यक्ष- विकास बाबासाहेब खोळपे.सहसरचिटणीस - जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण श्री. शशिकांत तिरसे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग, श्री.सचिन इंगळी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्री.सुनिल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, अमित शेगडे, प्रशांत ढगे, राहुल मुंडके, विठ्ठल इनामदार,अजित नैराळे, तहसिलदार सचिन शेजाळ, विशाल दौंडकर, विजय तळेकर, मुख्याधिकारी कर्जत पंकज पाटील, पेण नगर परिषद मुख्याधिकारी जीवन पाटील, अलिबाग मुख्याधिकारी श्रीमती अंगाई साळुंखे, उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र श्री.राम राठोड,
कार्यकारणी सदस्य- जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग, जि.प.रायगड डॉ.ज्ञानदा फणसे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, उपअधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग प्रदीप जगताप, उपअधीक्षक भूमी अभिलेख पनवेल विजय भालेराव, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश देवकर, गटविकास अधिकारी पनवेल संजय भोईर, सहाय्यक उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र श्री.बालाजी बी.चव्हाण, सहाय्यक आयुक्त,अन्न व औषध प्रशासन श्री.शेख, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ.विष्णू काळे, सहजिल्हा निबंधक शैलेंद्र साटम, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय सुरेश भारती, सहाय्यक पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विष्णू काळे, तहसिलदार सतीश कदम, सुरेश काशिद, विक्रम देशमुख, भाऊसाहेब अंधारे, दिलीप रायण्णावार, सचिन गोसावी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, श्री.अरुण पवार, गटविकास अधिकारी श्री.संजय भोईर.
नवनियुक्त पदाधिकांऱ्याना मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
Comments
Post a Comment