शाळेची घंटा पुन्हा वाजणार

राज्यात १ डिसेंबर पासुन शाळा सुरु-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई-प्रतिनिधी.

राज्यात १ डिसेंबरपासून सरसकट शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात १ ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील अनेक दिवस कोरोनामुळे शाळा बंद होत्या.अखेर सरसकट शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा सुरु होत्या. दरम्यान,आता ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  वयांनी सांगितले.

  आठ दिवस आम्ही पालकांशी,अधिकाऱ्यांशी चर्चा करू.विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण कसे देता येईल यावर भर देऊ, तसेच निवासी शाळांबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ,असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. दिवाळीनंतरच्या परिस्थितीचा अभ्यास करुन आम्ही हा निर्णय घेतला आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थी पुर्ववत जीवनात यायला हवेत म्हणून आम्ही आज शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाचा निर्णय आल्यानंतर आम्ही या शाळा सुरू करत आहोत. मागील काळात आम्ही मोठी खबरदारी घेतली होती. ही सर्व मुले छोटी आहेत. पण तरीही या मुलांना शाळेत आणणे महत्वाचे आहे.टास्क फोर्सशी देखील आम्ही चर्चा करणार आहोत.

  आॕनलाइन शिक्षणामुळे त्रासलेल्या विद्यार्थी व पालकांनी ह्या निर्णयाचे स्वागत केले आहे तर शिक्षक वर्गामध्ये सुद्धा आंनदाचे वातावरण आहे.


Comments

Popular posts from this blog