रोहा तालुका क्रीडा संकुलाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थित,पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्धघाटन संपन्न.

 पालकमंत्र्यांनी क्रिडा विश्वातील बदलांचे दिले संकेत.

रोहा/प्रतिनिधी 

             क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड,तालुका क्रीडा अधिकारी रोहा आयोजित क्रीडा संकुल रोहा नूतनीकरण उद्धघाटन महाराष्ट्राच्या राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती होती.

 ह्या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काही महत्वपुर्ण बाबी स्पष्ट केल्या."खेलो इंडिया"संकल्पनेतुन रायगडच्या क्रिडा विश्वात चैतन्य निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले .तर रुपये ८० कोटी निधीची मंजुरी असलेले कोकण विभागीय क्रिडा संकुल माणगाव येथे सुरु होत आहे.त्या माध्यमातून कोकणातील खेळाडूंना चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

                 ग्रामीण भागांतील खेळांडूना प्रोत्साहन मिळावे व दर्जेदार खेळाडू घडावे यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हा व तालुका स्तरावर क्रीडा संकुलाची निर्मिती केली.विविध क्रिडा प्रकारांचा सराव करुन खेळाडूंची एक पिढी उभे करण्याचे काम क्रिडा संकुल करित आहेत. मागील वर्षी निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपाचा फटका रोहा तालुका क्रिडा संकुलाला मोठ्या प्रमाणात बसला.क्रिडा संकुलाचे छप्पर उडाले तर प्लॕस्टर व आतील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

      रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी क्रिडा संकुल नुतनीकरणाचा पाठपुरावा केला.निधीची उपलब्धता केली त्याचेच फलित म्हणून क्रिडा प्रेमींसाठी क्रिडा संकुल पुन्हा एकदा सुसज्ज झाले.

तालुका क्रिडा संकुलाची अल्पावधीत दुरुस्ती करुन,नुतनीकरणाचा साज चढवणारे,तसेच दर्जेदार काम करणाऱ्या मेसर्स सुरज कंस्ट्रक्शनचे संचालक तथा रोहा तालुका बॕडमिंटन असोशिएशनचे अध्यक्ष श्री.संतोष भोईर यांचे आमदार अनिकेत तटकरे यांनी कौतुक केले.

कार्यक्रमासाठी पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे,विजयराव मोरे,जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील,विनोदभाऊ पाशिलकर,भगत,अनंतराव देशमुख ,सतिश भगत,आप्पा देशमुख,डाॕ.अशोक जाधव,संतोष भोईर,सुवर्णा रटाटे,महेंद्र गुजर,मयुर दिवेकर,युवक अध्यक्ष जयवंतदादा मुंडे,युवती अध्यक्षा रविना मालुसरे,घनश्याम कराळे,महेश कोल्हटकर,जिल्हा क्रिडा अधिकारी राऊत,लगोरीपटू श्री.गुरव,तालुका क्रिडा अधिकारी,तहसिलदार कविता जाधव,राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते,धाटाव ग्रामस्थ व क्रिडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog