आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी दिली यशवंतखार येथील सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट
रोहा-प्रतिनिधी
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी यशवंतखार येथील सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर यांचे निवासस्थानी दि.२७ नोव्हेंबर रोजी सदिच्छा भेट दिली.निमित्त होते सानेगाव-यशवंतखार येथील युवा नेतृत्व श्री.संतोष नथुराम भोईर यांच्या पुतण्याच्या विवाहाचे.
यशवंतखार ता.रोहा येथील रहिवासी असलेले व रायगड पोलीस दलातील कर्तबगार पोलीस कर्मचारी रामचंद्र नथुराम भोईर यांचे अल्पशा आजाराने काही दिवसांपुर्वी दुखद निधन झाले होते.
त्यांचा जेष्ठ पुत्र चि.तुषार याचा विवाह सोहळा दि.२८ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेला आहे.
त्याचे औचित्य साधुन आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी चि.तुषार याला शुभेच्छा देण्यासाठी श्री.संतोष भोईर यांच्या निमंत्रणावरुन सदिच्छा भेट दिली.
यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी भोईर कुटूंबीयांची आपुलकीने चौकशी केली व त्यांना विवाह समारंभासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
Comments
Post a Comment