संभे ता.रोहा येथे शंभरहून अधिक मधुमेही रुग्णांची मोफत तपासणी 

लायन्स क्लब ऑफ कोलाडचा स्तुत्य उपक्रम रोहा- नरेश कुशवाहा

नोव्हेंबर हा महिना "मधुमेह जागृती माह" म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जातो.त्याचे औचित्य साधुन लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाच्यावतिने सामाजिक बांधीलकीतून कोलाड संभे येथे शंभरहून अधिक मधुमेह रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

इंटरनॅशनल लायन्सक्लब डिस्ट्रिक्ट 3231 A 2 रिजन थ्री झोन टू सन 2021/22 नोव्हेंबरचा उपक्रम म्हणून लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा,व Aimil pharmaceuticals india ltd व डॉ विनोद गांधी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रुप ग्रामपंचायत संभे ता.रोहा यांच्या सहकार्याने मधुमेही रुग्णांची मोफत तपासणी व प्राथमिक औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रुप ग्राम पंचायत संभे येथे सदरच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा च्या वतीने ग्राम पंचायत संभे यांना प्राथमिक उपचार किटचे वाटप करण्यात आले. 

लायन्स क्लब आयोजित मधुमेह  शिबिरात शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले.यावेळी लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाचे अध्यक्ष डॉ.सागर सानप, क्लबचे चेअरपर्सन रविंद्र घरत,सेक्रेटरी रविंद्र लोखंडे,डॉ. विनोद गांधी, डॉ.मंगेश,सानप,सुनिल पाटील (Aimil pharma.india ltd) नंदकुमार कळमकर,तसेच माजी सरपंच राजेश सानप,तंटामुक्ती समिती ग्रा.पं. संभे व डायरेक्टर खरेदी विक्री संघ,रोहा तालुका कुणबी समाजाचे सचिव शिवराम महाबळे,संभे ग्राम पंचायतचे सरपंच समीर महाबळे, उपसरपंच अदिती बाकाडे, ग्रा.पं.सदस्या सई ठाकूर,सदस्य संजय सानप,माजी सदस्य नितेश ठाकूर, माजी सदस्य अजय बाकाडे , ग्रामसेविका गिजे मॅडम, ललित पवार ,नितीन शेळके,ज्ञानेश्वर महाबळे ,महेश ठाकूर ,लायन मेंबर महेश तुपकर,दिनकर सानप ,सौ.पूजा लोखंडे,तसेच विशेष सहकार्य ग्रामपंचायत हद्दीतील संभे,पाले खुर्द आणि पाले बुद्रुक येथील ग्रामस्थ,वीरहनुमान कला,क्रीडा सांस्कृतिक मंडळ संभे व लायन्सक्लब कोलाडचे पदाधिकारी यांनी हे शिबीर यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

लायन्स क्लब आॕफ कोलाडच्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog