रायगड जिल्ह्यावर शोककळा
खालापुर,कर्जत तालुक्यातील पायी दिंडीला मावळमध्ये भीषण अपघात
चार वारकऱ्यांचे देहावसान,अनेक वारकरी जखमी
खालापुर-प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील सातेगाव जवळ आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आळंदीकडे पायी जाणाऱ्या पालखीमध्ये भरधाव वेगातील टेम्पो घुसल्याने झालेल्या अपघातात दोन महिला वारकरी जागीच मृत्युमुखी पडल्या असून सुमारे चोवीस वारकरी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वडगाव मावळ चे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले की, जखमी विविध रुग्णालयात असल्याने त्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. प्रथम सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
खालापूर तालुक्यातील उंबरे, खोपोली व कर्जत भागातील अंदाजे दोनशे वारकरी या पायी दिंडी मध्ये सहभागी झाले होते. पहाटेच्या सुमारास माऊली कृपा चॕरीटेबल ट्रस्ट उंबरे खालापूर ही पालखी आळंदीकडे जात असताना साते गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या अपघातामध्ये सविता वाळकु येरभ, वय ५८वर्षे राहणार उंबरे तालुका खालापुर जिल्हा रायगड व जयश्री आत्माराम पवार वय ५४वर्षे राहणार भूतवली तालुका कर्जत जिल्हा रायगड यांचा जागीच मृत्यू झाला असून सुरेखा चोरघे व संगिता शिंदे उपचार असताना निधन झाले.तर मंदा बापू वाघमारे,वनिता बबन वाघमारे,रंजना गणेश वाघमारे, राजेश्री राजेश सावंत सर्व राहणार उंबरे तालुका खालापूर, सुरेखा तुळशीराम कर्णक, वंदना राम कर्णक,माणिक कर्णक तिघे राहणार बीड खुर्द,शोभा सावंत, पुष्पा पालकर,अनुसया जाधव, बेबी कदमुख,अनुसया मधुकर जाधव,दिव्या दिपक धंदावकर,आशा साबळे,रामदा आहेर, सोनाबाई धुरगे,पुष्पांजली कर्णक,सुभद्रा सिताराम शिंदे, बेबी सावंत,दिव्या चांदुरकर, सुरेखा चोरगे,सुभद्रा सदाशिव चोरगे,रंजना अशोक कर्णक,राधिका बाळकृष्ण भगत हे वारकरी जखमी झाले आहेत.
दरम्यान ह्या अपघाताचे वृत्त समजताच खालापुर तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात शोककला पसरली आहे.
अपघाताच्या ठिकाणाचा विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा👇👇
Comments
Post a Comment