रोह्यातील नवरत्न हॉटेल मागील इमारतीखाली पार्क केलेल्या मोटरसायकलची चोरी 

घटना सी.सी.टी.व्हि.मध्ये कैद

   

रोहा-प्रतिनिधी

रोह्यातील नवरत्न हॉटेल मागील परमार नगर इमारतीखाली पार्क केलेल्या हिरो होंडा कंपनीची मोटर सायकल चोरीला गेली आहे .

  याबाबत सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे,परमार नगर मध्ये राहणारे श्री.सतिश काशिनाथ म्हात्रे यांची MH 06 AE 6280 हिरो होंडा कंपनीची स्लेंडर मोटरसायकल बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पार्क करण्यात आली होती.दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये प्रवेश केला.या व्यक्तीने गाडीचे हॅण्डल पकडून गाडी हाताने खेचून बाहेरच्या रस्त्यावर नेली.तेंव्हापासुन आजतागायत गाडीचा व अज्ञात व्यक्तीचा शोध लागला नाही. सदरची घटना सी.सी.टी.व्ही.मध्ये कैद झाली आहे. 

    या घडलेल्या चोरीच्या घटनेची तक्रार श्री. सतिश काशिनाथ म्हात्रे यांनी रोहा पोलीस स्टेशनमध्ये दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी गुन्हा रजिस्टर नंबर १३४/२०२१ भारतीय दंडविधान कलम ३७९ अंतर्गत दाखल केली आहे.पोलीस निरीक्षक श्री.संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी व्हि.के. वारगुडे हे अधिक तपास करीत आहेत. चोरीच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आंबेवाडी येथून एक मोटरसायकल चोरीची घटना घडली आहे त्यामुळे या परिसरात मोटरसायकल चोरांची टोळी कार्यरत असल्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.



Comments

Popular posts from this blog