लायन्स क्लबचा स्तुत्य उपक्रम 

उर्जा संवर्धनावर संवादाचे आयोजन

रोहा-प्रतिनिधी

लायन्स क्लब रोहा च्या वतीने "राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे" औचित्य साधून रोहा नगरपरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धन काळाची गरज या विषयावर 16 डिसेंबर ला संवादाचे आयोजन केले होते. यावेळी 150 विद्यार्थ्यांनी ऊर्जा संवर्धनाची शपथ घेतली. ऊर्जा संवर्धन क्षेत्रातील तरुण तज्ञ लिओ ऋषिकेश डाळे हे प्रमुख मार्गदर्शक होते.ऋषिकेश डाळे इशरे ह्या राष्ट्रीय संस्थेच्या ठाणे विभागाचे यूथ चेयर असुन Jacobs ह्या कंपनी मध्ये इंजीनियर पदावर काम करतात.   

 विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ऊर्जा म्हणजे काय, पारंपरिक आणि अपारंपारिक  ऊर्जा स्त्रोत, त्यांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर काय उपक्रम आहेत. आपण आपल्या दैन दिन जीवनात आपण प्रत्येक जण कशा प्रकारे ऊर्जेचा अपव्यय टाळू शकतो या विषयी माहिती दिली. 

कार्यक्रमासाठी मुख्यध्यापक दिपक लांगे, सुविधा दांडेकर, श्रद्धा साळुंखे, स्नेहा तांडेल, अमृता बोरये, दर्शना पाटील, जान्हवी जंजिरकर, लायन्स क्लब चे वरिष्ठ सभासद लायन वेंकट माने, लायन पी बी गिरासे, उपाध्यक्ष लायन भाऊसाहेब माने, सुश्मिता शिताळकर, झोन चेअर पर्सन लायन नुरुद्दिन रोहवाला, खजिनदार पराग फुकणे, सचिव डॉ कृष्णा जरग उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog