सर्वेश थळे द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित
रोहा-प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय आर्चरी खेळाडू कु. सर्वेश थळे यास द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यतील उरण येथील अत्यंत नामांकित व मानांकित द्रोणागिरी स्पोर्ट असोसिटशन तर्फे संपन्न करण्यात आलेल्या २२ व्या क्रीडा महोत्सवात कु. सर्वेश निवास थळे या आंतराष्ट्रीय आर्चरी खेळाडूला द्रोणागिरी भूषण या राज्यस्तरीय पुरस्कार या सन्मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
उरण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार मनोहर भोईर, नरवीर तानाजी मालुसरे व सूर्याजी मालसुरे यांचे वंशज अनिल मालसुरे,द्रोणागिरी स्पोर्टस् असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष महादेव घरत व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते हा मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला आहे.
कु.सर्वेश थळे याने अत्यंत कमी वयात आर्चरी क्रीडा प्रकारात विविध स्तरांवर मोठ्या प्रमाणावर पारितोषिकं मिळविली आहेत.तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्याने आपल्या देशाचे नेतृत्व करून आपल्या देशाचा सन्मान वाढविला आहे.सर्वेशच्या या उज्ज्वल कामगिरीची दखल घेऊन द्रोणागिरी स्पोर्ट असोसिटशन तर्फे त्याचा गौरव करण्यात आला आहे.तर सर्वेशच्या या सुयशाबद्दल क्रीडाप्रेमी नागरिक यांच्यासह समाजातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्याकडून अभिनंदन व्यक होताना दिसत आहे.
Comments
Post a Comment