गोफण येथील सेवावृत्तीचे नारायण कडू यांचे दुःखद निधन 

रोहा-प्रतिनिधी

             रोहा तालुक्यातील गोफण या गावचे रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण महादू कडू यांचे रविवारी दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले.त्यांचे वय 75 वर्षे होते. नारायण कडू, "आप्पा" हे गोरगरीब जनतेसाठी झटणारे होते.गोफण गावच्या विकास कामांमध्ये त्यांचा मोठा  वाटा होता. समाजहित व लोकसेवा करणे यामध्ये ते नेहमी तत्पर असायचे.धार्मिक कार्यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असायचा. अभ्यासूवृत्ती असल्यामुळे त्यांचं वकृत्व हे नेहमी प्रभावशाली होते. त्यांनी जनतेची निस्वार्थपणे सेवा केली.ते नामधारी राधास्वामी सत्संग ब्यास पंजाब मध्ये  आयुष्य समर्पित केले.नारायण महादू कडू "आप्पा" यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या अकस्मित निधनाने कडू परिवार कुटुंब'नातेवाईक, मित्रपरिवार यांसह ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे."असा माणूस पुन्हा होणे नाही". 

त्यांचे पुढील विधी दशक्रिया 20 डिसेंबर 2022 रोजी गोफण येथे होणार आहे. उत्तरकार्य 23 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार आहे. 

परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कडू परिवारला दुःखातुन सावरण्यासाठी शक्ती देवो.हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Comments

Popular posts from this blog