रोहे हनुमान नगर येथे श्री दत्तजन्मोत्सव व श्रीसत्यनारायण महापूजेचे आयोजन
खारी/रोहा (केशव म्हस्के )
रोहे शहरातील हनुमान नगर येथे बुधवार दि.०७ डिसेंबर २०२२ रोजी मार्गशीर्ष शु.पौर्णिमा श्रीदत्त जयंती जन्मोत्सव सोहळा व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
सालाबाद प्रमाणे याहीवर्षी घोसाळे रोड हनुमान टेकडीच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या हनुमान नगर येथील श्री दत्त मंदिरामध्ये मार्गशीर्ष शु.पौर्णिमा श्रीदत्त जयंती जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
बुधवार दि.०७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ०७:३० "श्रीं"च्या मूर्तीवर अभिषेक,०९:०० वाजता श्री.सत्यनारायणाची महापूजा,दुपारी ०३:०० ते ०५:०० दरम्यान रायगड भूषण पुरस्कार प्राप्त गुरुवर्य हभप. बाळाराम महाराज शेळके (रायकरपार्क - रोहा) यांचे श्री दत्तजन्मोत्सव पर हरी कीर्तन सेवा,महाआरती पूजा विधी सायंकाळी ०७:३० ते १०:०० वाजेपर्यंत तीर्थ प्रसाद महाप्रसादि अन्नप्रसाद तद्नंतर स्थानिक महिलांकरिता विशेष मेजवानी म्हणून "होम मिनिस्टर"आदी विविध अध्यात्मिक,धार्मिक,सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे करण्यात आले आहे सदरील कार्यक्रमास परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थिती दर्शवत श्रींच्या दर्शनाचा व श्रवण सुखाचा लाभ घेत कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांचा वतीने करण्यात आले आहे..
सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी हनुमान नगर येथील ग्रामस्थ,महिला मंडळ तरुण युवक मित्र मंडळ परिवार विशेष व अथक परिश्रम घेत आहेत.
Comments
Post a Comment