तळवली तर्फे अष्टमी ग्रामपंचायतीवर ग्रामविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व

तर थेट सरपंचपदी रविंद्र मरवडे यांची निवड

खांब-रोहा-नंदकुमार मरवडे

संपुर्ण रोहे तालुक्याचे लक्ष लागलेल्या तळवली तर्फे अष्टमी ग्रु.ग्रा.पंचायतीच्या पार पडलेल्या निवडणुकीत येथील ग्राम विकास आघाडीने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून थेट सरपंचपदासह सर्वच्या सर्व उर्वरित ७ जागांवर विजय मिळवून आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.

       विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून व निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप व भाजपा यांनी ग्रा.विकास आघाडी निर्माण करून ही निवडणूक लढवून हा विजय संपादित केला आहे.तर प्रत्यक्ष मतदानापूर्वीच या आघाडीची एक जागा बिनविरोध आल्याने आघाडीला शुभ शकून झाल्याने आघाडीचे मनोधैर्य अगोदरच वाढल्याने व प्रत्यक्षात निवडणूक कालावधीत केवल विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवून व विजय संपादन करून आपले विजयाचे ध्येय साध्य केले आहे.

           तर  निकालाच्या दिवशी मतमोजणी नंतर निकाल हाती येऊन सर्वच्या सर्व जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी घोषित झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप व भाजपा आदी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून,गुलाल उधळून व विजयाच्या घोषणा देऊन आपला आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी विभागीय नेते महेंद्र पोटफोडे, रामचंद्र चितळकर, बाबूराव बामणे,प्रकाश थिटे, नरेंद्र जाधव,मनोज शिर्के,सूरज कचरे,वसंत भोईर, आघाडीचे सर्वस्वी राम मरवडे, वसंत मरवडे, मारूती खांडेकर,राम महाडिक, शांताराम महाडिक,नाना शिंदे,सहादेव महाडिक,प्रमोद शिंदे,प्रमोद लोखंडे, गजानन बामणे,नारायण महाडिक,विनायक महाडिक,ठमाजी महाडिक आदी आघाडीच्या प्रमुख नेते मंडळी यांच्यासह तमाम कार्यकर्ते यांनी सरपंच व विजयी उमेदवार यांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog