उडदवणे येथे लायन्स क्लब रोहा -कोलाड यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

रोहा-प्रतिनिधी

 लायन्स क्लब रोहा- लायन्स क्लब कोलाड यांच्यावतीने तसेच लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग,समता फाउंडेशन मुंबई,अंशुल स्पेशलिस्ट मोलेक्युल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने शनिवार दिनांक १० डिसेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर प्राथमिक शाळा उडदवणे येथे संपन्न झाले. 

या शिबिरामध्ये उडदवणे तसेच आजूबाजूच्या गावातील ७० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला .

शिबीर यशस्वी करण्यासाठी सचिन गायकर मोरेश्वर माळी, सुधीर गायकर, प्रदीप कासारे,तेजस गायकर,गणपत गायकवाड,रोशन ठाकूर ,रोहित माळी, दिपक कोल्हटकर, संतोष गायकर,नितेश शिंदे, महेश तुपकर ,सागर मांटे,संदीप कोल्हटकर,चंद्रकांत गायकर,रुचिता गायकर,पूजा गायकर, साक्षी गायकर, काजळ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सरिता गायकर तसेच युवा नेतृत्व रविंद्र ठाकूर आणि ग्रामस्थ मंडळ उडदवणे यांनी अथक परिश्रम घेतले.

या सामाजिक उपक्रमाचा समाजातील तळागाळातील जनतेला लाभ झाल्यामुळे शिबीराचा हेतू साध्य झाल्याचे म्हटले जात आहे.

Comments

Popular posts from this blog