"भक्ती हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे"

--दिनेश महाराज कडव

मुठवली येथे तुपकर परिवाराचे श्रीसत्यनारायण महापुजा प्रसंगी किर्तनरुपी सेवेप्रसंगी महाराजांनी केले मार्गदर्शन

रोहा-प्रतिनिधी

"भक्ती हा जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे भक्तीमय उद्गार", ह.भ.प.दिनेश महाराज कडव यांनी आपल्या हरिकिर्तनरूपी सेवेप्रसंगी उपस्थित भाविकांना संबोधित करताना काढले.

       रोहे तालुक्यातील मुठवली खु.येथे समस्त तुपकर परिवाराचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुलस्वामीनी उत्सव तथा श्रीसत्यनारायणाची महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम प्रसंगी ह.भ.प.दिनेश महाराज कडव यांच्या हरिकिर्तनरूपी सेवेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.वै.गुरूवर्य अलिबागकर महाराज, गोपाळबाबा वाजे व धोंडू बाबा कोलाटकर यांचे कृपाछत्राखाली व रायगड भूषण ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील व ह.भ.प.भाऊमहाराज निकम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी श्री.सत्यनारायणाची महापूजा,महाआरती, महाप्रसाद, हरिपाठ,हरिकिर्तन व जागर भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विभागातील ह.भ.प. नाना महाराज देशमुख,काशिनाथ भोसले,गणेश सानप, भाई देवकर,विठोबा भोकटे,हेमंत कडव,राम सावंत,अशोक तुपकर,देवजी मरवडे, चंद्रकांत शिंदे,नथुराम तुपकर,सतीश ठाकुर आदींसह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog