ग्राहकांना सेवा देणे हे दुकानदारांचे कर्तव्य उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे

रास्तभाव धान्य दुकानांमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

तळा :संजय रिकामे 

तळा रास्त भाव धान्य दुकान नंबर १ मध्ये २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून तहसीलदार ए.एम. कनशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राहकांना गुलाब पुष्प देऊन हा दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, रास्त भाव धान्य दुकानदार अध्यक्ष बबन (भाऊ) भौड सचिव रमण कोलवणकर,तानाजी कालप, गणेश वाघमारे शिव भोजन केंद्राचे संचालक राजाराम तळकर पत्रकार किशोर पितळे पत्रकार आंबेगावे, महसूल लेखनिक संदीप आखाडे मोरेश्वर फुलारे, राजेंद्र कुडेकर सर मिलिंद दलाल इत्यादी उपस्थित होते. 

              उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी ग्राहक दिनाचे महत्व विषद केले.१९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते.ग्राहकांना सेवा देणे हे दुकानदारांचे कर्तव्य आहे.ते प्रत्येकांनी करावे.ग्राहकांना त्यांचे हक्क व जबाबदाऱ्यांबद्दल अधिक जागरूक करणे ग्राहकांना प्रभावी संरक्षण प्रदान करणे सदोष वस्तू, सेवा कमतरता आणि अनुचित व्यापार पद्धती यांसारख्या शोषणविरोधी प्रकारांविरूद्ध कार्य केले जाते आजचा दिवस खूप महत्वाचा आहे असे सांगून ग्राहकांना शुभेच्छा दिल्या. 

                   यावेळी कनशेट्टी म्हणाले आज ग्राहक दिन साजरा केला जात आहे प्रत्येक रेशन दुकानां मधून हा साजरा केला जात आहे ग्राहक दुकानदाराचा देव समजून  चांगली तत्पर सेवा दिली पाहिजे उत्तम सेवा देणे हे दुकानदाराचे असे कर्तव्य आहे यासाठी ग्राहक हक्क संरक्षण कायदा केला असून त्याची अंमलबजावणी सर्वांनी करणे हे जबाबदारी आहे.त्याच प्रमाणे त्यांनी रेशनकार्डाचे महत्व व मिळणाऱ्या सुविधा विषद केल्या.



Comments

Popular posts from this blog