अवचितगड प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक बांधिलकीतुन रा.जि.प.शाळा रेवोली येथील विद्यार्थ्यांना ओळखपत्र व खाऊचे वाटप 

रोहा-प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील अवचितगड प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष उदय मोरे यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा रेवोली व अंगणवाडी  रेवोली मधील मुला-मुलींना ओळखपत्र व शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

          सदर साहित्य वाटपाचा कार्यक्रम रोहा पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव महाले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.गेली तीन वर्ष हा उपक्रम अवचितगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण पत्रकार उदय मोरे, सेवानिवृत्त रायगड जिल्हा परिषद चे कार्यकारी अभियंता के. वाय. बारदेस्कर यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविला जातो. अवचितगड प्रतिष्ठानच्या सामाजिक शैक्षणिक कार्याचे कौतुक करून ग्रामीण भागातील मुलामुलींना शैक्षणिक उत्साह निर्माण करण्याचा हा चांगला प्रयत्न आहे, असे माजी सभापती लक्ष्मणराव महाले म्हणाले. मुलांमध्ये  शिक्षणाबद्दल आवड व जन जागृती निर्माण व्हावी या हेतूने अवचितगड प्रतिष्ठान ने सामाजिक बांधिलकी जपत अल्पशः प्रयत्न केला आहे     हा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समिती व पालक संघाच्या अध्यक्षा प्रांजली प्रमोद शेलार,ग्रामपंचायत सदस्या नम्रता महाले , ललिता तुकाराम घरट ,चैतन्य चेतन महाले नीता सुनील पवार, सलोनी सत्यवान भोईर, केंद्रप्रमुख खालापकर सर अंगणवाडी सेविका जयश्री जयंता गोवर्धने, मुख्याध्यापिका मनिषा उदय मोरे शिक्षक प्रतिनिधी शिल्पा गणेश दुधबर्वे यांच्या उपस्थितीत पार पडला.

                   हा उपक्रम राबविल्याबद्दल शाळेच्यावतीने अवचितगडचे अध्यक्ष उदय मोरे सरचिटणीस हरेश राम कापसे रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता के. वाय. बारदेशकर यांना धन्यवाद देण्यात आले. आभार मुख्याध्यापिका मनिषा उदय मोरे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog