धाटाव येथील विधी स्पेशलीटी फूड इंग्रीडेंट्स लिमिटेड मध्ये जनरल मजदुर सभा ठाणे युनियनची पुनश्च स्थापना

रोहा /अष्टमी-नरेश कुशवाहा

"आपण पुन्हा एकत्र येऊन माझ्या वर विश्वास ठेवत आपली जनरल मजदुर सभा ठाणे युनियन स्थापन केली आपण सर्व जण एकत्र काम करून कामगारांना न्याय मिळवून देऊ असी ग्वाही मी सर्व पदाधिकारी व कामगारांना देतो आणि आपल्या युनियन मध्ये सर्वांचे स्वागत करतो आपण जवळ जवळ दहा वर्षे लांब राहिलो त्यामुळे आपलं कामगार मित्रांचं नक्कीच नुकसान झाले आहे, पण काळजी करू नका. आपण आता एकत्र काम करुन ती भर काढु. तुम्ही विचार करत होतात, काही वर्षांपूर्वी आपण वेगळे झालो होतो. आता साहेबांसमोर कसे जाऊ. पण माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. माझ्या सोबत आहेत ते पण आपले आणि जे सोडून गेले ते पण आपले. मी माझं कर्तव्य करतो आणि न्याय मिळवून देतो" असे प्रतिपादन जनरल मजदुर सभा ठाणेचे जनरल सेक्रेटरी सुर्यकांत वढावकर यांनी केले. ते धाटाव येथील विधी स्पेसिलीटी फुड इंग्रीडेंटेस लिमिटेड कंपनीत युनियन स्थापनेच्या वेळी बोलत होते.  

या वेळी युनियनचे बोर्ड कंपनी समोर लावून श्रीफळं वाढवुन अनावरण करण्यात आले.  

यावेळी वढावकर यांच्या समवेत युनियनचे सुहास खरिवले, अनंता देशमुख , जगदीश उपाध्ये व मजदुर युनियनचे अध्यक्ष श्रीकांत जंगम, उपाध्यक्ष अनंता म्हसकर, सचिव नवीन पाटील, खजिनदार किशोर रटाटे, सल्लागार मंगेश मुंढे, आदि उपस्थित होते.

 या वेळी मजदुर युनियनचे अध्यक्ष जंगम  यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "युनियन सोडल्याची खंत माझ्यासह सर्व पदाधिकारींच्या मनात होती. आम्ही पुन्हा या युनियन मध्ये कधी सामिल होतोय याची वाट पाहत होतो. तो सुवर्णदिवस  आज आला.कामगारांवर आज पर्यंत झालेले अन्याय वढावकर साहेबांच्या मदतीने भरून काढु". 

यावेळी कामगारांच्या अनेक समस्या कंपनी युनियनचे अध्यक्ष जंगम यांनी मांडल्या व उपस्थितांचे आभार मानले .

Comments

Popular posts from this blog