ट्रस्टची ध्येय धोरण समजुन घेणे ही काळाची गरज- ट्रस्ट अध्यक्ष अशोक दाते 

रायगड जिल्हा कार्यकारणी संयुक्त सभा उत्साहात संपन्न

तळा-संजय रिकामे

महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट यांची रायगड जिल्हा येथील स्थानिक शाखा संयुक्त सभा गुरुवार दिनांक २२.१२.२२ रोजी गोवेळे विभाग सहाय्यक समिती श्रीकृष्ण मंदिर सभागृह चिंचवलीवाडी गोरेगाव येथे पार पडली या सभेसाठी महारष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक दाते, उपाध्यक्ष सहदेव काते, सरचिटणीस राजेंद्र महाडिक,खजिनदार गंगाराम महाडिक,सह चिटणीस प्रशांत केळसकर, विश्वस्त अजय बिरवटकर, अविनाश कांबळे, चंद्रकांत चीले,सुरेश तांबडे,उदय पाटील,प्रीती खताते, सुप्रिया पगार माजी अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी विश्वस्त सुरेश पागार सर्व शाखांचे अध्यक्ष समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.                              

                 कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री कृष्ण प्रतीमेचे पुजन व दिप प्रज्वलन करण्यात आले तदनंतर प्रमुख पाहुणे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला.यावेळी मृत पावलेले सभासद ज्ञाती बांधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच आणि सदस्यपदी निवडून आलेल्या समाज बांधव आणि भगिनींचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.सभेला संबोधीत करताना अध्यक्ष अशोक दाते म्हणाले की  संयुक्त सभे निमित्त फीरत असताना समाज बंधवां सोबत संवाद साधत असताना वेगळाच आनंद मिळत आहे.ट्रस्टची ध्येय धोरण समजुन घेणे ही काळाची गरज आहे आजच्या या तांत्रिकी युगात शिक्षणाला महत्व असुन विद्यार्थ्यांसाठी ट्रस्टच्या वतीने मोफत वह्यांचे वाटप शिष्यवृत्ती देण्यात येते त्याचा लाभ घेण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा असे त्यांनी यावेळी सांगितले                                     धर्मादाय आयुक्तांकडे संपूर्ण ट्रस्टच्या लोखाजोखा सादर करायचा असल्यामुळे शाखा अध्यक्ष आणि कार्यकारणी यांनी हिशोब वेळेत द्यावा अशी विनंती त्यांनी केली. अहवाल सादर करण्यात ज्यांना अडचणी येत आहेत.त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.करोना काळात स्थानिक वर्धापन दिन आपण घेऊ शकलो नाही परंतु आता वर्धापन दिन साजरा करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले.सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणी येत असतात परंतु या अडचणींना सामोरे जात ईच्छा शक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर समाजाची प्रगती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी समाज बांधवांना केले.स्थानिक तळा शाखा अध्यक्ष खेळू वाजे यांनी ट्रस्टचे पदाधिकारी आणि वीश्वस्त चांगल्या प्रकारचे काम करत असून रायगड जिल्ह्यातील शाखा अध्यक्ष आणि सर्व कार्यकारणी त्यांचे मागे ठाम उभी आहे असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.                           या कार्यक्रमाचे प्रास्तविक सरचिटणीस दिलीप खेडेकर यांनी केले तर आभार राजेंद्र महाडिक  यांनी मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली  हा कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हा स्थानिक शाखा अध्यक्ष यांनी चांगल्या प्रकारचे नियोजन केले होते.

Comments

Popular posts from this blog