कमळाकर चोरगे(गुरुजी)यांचा षष्ठ्यब्दिपुर्ती सोहळा साजरा.

अनेक मान्यवरांची उपस्थिती.


तळा- किशोर पितळे

तळा फोंडळवाडीचे सुपुत्र तथा सेवानिवृत्त शिक्षक कमलाकर चोरगे (गुरूजी) यांचा (६०) षष्ठयब्दीपुर्ती सोहळ्याचे आयोजन काल २४ डिसेंबर २१ रोजी करण्यात आले होते.तसेच या आनंददायी सोहळ्याचे औचित्य साधून नातीचे नामकरण विधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईक मित्र मंडळी सन १९७८ सालच्या एस् एस् सी बँचच्या वर्ग मित्रांनी खास आकर्षण होते. हितचिंतक,आजी माजी शिक्षक वर्ग,नगराध्यक्षा रेश्मा मुंढे भाजप प्रदेश सचिव रवीभाऊ मुंढे, डॉ.वडके अँड चेतन चव्हाण,सप्रे मेडिकलचे मालक राजू सप्रे उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी कमळाकर चोरगे (गुरूजी)यांच्या जीवनपटाची पाने उलगडून गरीब कुटुंबात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्ध आत्मविश्वास च्या बळावर शिक्षण घेऊन आदर्श शिक्षक,आदर्श कुटुंब, विद्यार्थी कसे घडविले याबाबत मनोगतात व्यक्त केले. याआनंददायी सोहळ्यात मित्र मंडळी आप्तेष्टनातेवाईक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होऊन पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्र संचालन विजय पवार गुरुजी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog