धामणसईचा अक्षय निकम राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत चमकला

राजस्थान येथील राष्ट्रीय दिव्यांग पॅराकबड्डी स्पर्धेवर महाराष्ट्रचा झेंडा 

तळा-किशोर पितळे

कबड्डीची पंढरी समजल्या जाणाऱ्या रोहा तालुक्यातील एका दिव्यांग्याने केलेल्या चमकदार कामगिरीने रोहा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे 

    पुष्कर,राज्यस्थान येथे चालू असणाऱ्या राष्ट्रीय दिव्यांग पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र व मुंबई पॅरा कबड्डी संघाने चांगली कामगिरी करत आपले स्थान प्रस्थापित करून आज उपांत्य फेरीत सहभागी झाले आहेत.राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जनार्दनसिंह गहलोत याच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय पॅराकबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने अ- गटात झारखंड बिहार, मुंबई व उत्तर प्रदेश या संघाना हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला तर मुंबई संघाने झारखंड, बिहार व उत्तर प्रदेश या संघाना हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

     महाराष्ट्र संघाकडून  रायगड जिल्ह्यातील राजेश मोकल, अक्षय निकम,ओमकार महाडिक व कर्णधार रमेश संकपाळ, मुकुल खाडे नंदुरबार जिल्ह्यातील महेश वसावे, सांगली जिल्ह्यातील आरिफ शेख आणि मुंबई संघाकडून नंदुरबार जिल्ह्यातील रायसिंग वसावे, सांगली जिल्ह्यातील ज्योतिराम कदम रायगड जिल्ह्यातील कर्णधार मंगेश म्हात्रे,गणेश पाटील यांनी चांगली कामगिरी केली असे कुलाबा दिव्यांग क्रिडा असोसिएशन महाराष्ट्र व सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रोहा रायगडचे सचिव व दोन्ही संघाचे व्यवस्थापक शिवाजी पाटील  व सहव्यवस्थापक संकल्प अपंग संस्थेचे सचिव बाबाराव धोत्रे  यांनी माहिती दिली.

 जय भैरवीनाथ मित्र मंडळ- धामणसई,जे.बी.सी.मंडळ धामणसई यांनी अक्षय निकम याला दिलेल्या अफलातुन शुभेच्छा त्यांच्याच शब्दात......

  ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

कर्तुत्वाला आणि ध्येयाला मेहनतीची जोड लाभली की यश हमखास गवसतेच.अंगभूत गुणांच्या जोरावर शारीरीक व्यंगालाही आपली ताकद बनवून धामणसई गावचा हा सितारा राष्ट्रीय पातळीवर चमकला..

          कठोर परिश्रमाने आणि चिकाटीने केलेल्या मेहनतीच्या जोरावर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धामणसई या छोट्याशा खेड्यात जन्माला आलेला कु.अक्षय दत्ता निकम याची दिव्यांग पॕरा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली.अजमेर राजस्थान येथे झालेल्या या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघ उपविजेता ठरला.

        धामणसई गावच्या या सुपुत्राच्या खेळाने सगळेच प्रभावित झाले.त्याच्या उत्कृष्ट खेळाने निवड समितीचेही लक्ष वेधून घेतले आणि अक्षयची निवड भारतीय संघात झाली..याच्यापेक्षा एक गावकरी म्हणून अभिमानाची बाब काय असू शकते.

          आज गावपातळीवर खेळणाऱ्या , सर्वसामान्य कुटुंबातील एका दर्जेदार कबड्डीपट्टूला देशपातळीवर खेळताना पाहाण्याचे भाग्य लाभणार आहे. खुप साऱ्या शुभेच्छा अक्षय. देशाचे प्रतिनिधित्व करताना तुझा खेळ असाच बहरत राहो.साता -समुद्रापारही तुझा खेळ असाच बहारदार होवो.

 आपल्या विकलांगतेवर मात करून कबड्डीत चमकदार कर्तृत्व गाजवणाऱ्या अक्षय निकम याला 🔱 आदिशक्ती न्युज 🔱  कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog