शिक्षण महर्षी उमाजी गोरीवले यांचे निधन
शैक्षणिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व हरपल्याने सर्वत्र शोककळा
कोलाड - श्याम लोखंडे
रोहा तालुक्यातील तिसे गावचे बहूआयामी व्याक्तिमत्व तालुक्याचे वैभव तथा शिक्षण महर्षी शैक्षणिक, सामाजिक आध्यात्मिक, सांस्कृतिक, कला क्रीडा व राजकीय क्षेत्रात अग्रेसर, करारी बाणा, मलखंबा खेळाचे खेळाडू, वीर हनुमान मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच ग्रुप ग्राम पंचायत ति चे माजी सरपंच,पंधरा वर्षे सरपंच पद भूषविलेले, कुडली विभाग शेतकरी सेवा संघाचे माजी अध्यक्ष अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गावात माध्यमिक शाळा उभारण्यात यशस्वी झाले. त्यामुळे या परिसरातील विविध समाज घटकातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे या करिता सन 2000 साली दिनाभाई मोरे शिक्षण संस्था सानेगाव संचालित शाळा तिसे गावात स्वतःच्या मालकीची शेत जमीन देत कै.कृष्णाजी संभाजी गोरीवले यांच्या नावाने पहिले माध्यमिक हायस्कूल सुरू केले.
महान कर्तबगार थोर बुद्धिमान व्यक्तिमत्व असलेले उमाजी गोरीवले यांचे 24 डिसेंबर रोजी मध्यरात्री वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे गोरीवले कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिसे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे .
उमाजी गोरीवले हे खासदार सुनिल तटकरे यांचे खंदे समर्थक होते.त्यांची शैक्षणिक,सामाजिक कार्याबरोबरच राजकीय कारकीर्द मोठी होती.त्यामुळे15 वर्षे तिसे ग्राम पंचायतीच्या सरपंचपदाचा कार्यभार संभाळत शैक्षणिक व सामाजिक शेतकरी संघटनेचे काम करत तिसे गावचे नाव देशपातळीवर पोहचवले आहे. खासदार सुनिल तटकरे,माजी केंद्रीय मंत्री कै. बॅ.अंतुले, माजी आमदार कै.अशोकशेठ साबळे,कै. पा.रा.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली महान कार्य केले .
ते शेतकरी वर्गाच्या पाठीशी उभे राहणारे व त्यांना नेहमी साद देणारे त्याच बरोबर सर्व समाज घटकांचा न्याय निवडा व तंटे मिटवणारे असे होते. गोरीवले यांच्या निधनाची वार्ता समजताच दिनाभाई मोरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य नंदू म्हात्रे,राजिप सदस्य दयाराम पवार,आंबेवाडी ग्रामपंचायत चे सरपंच सुरेश महाबळे,खांब ग्रामपंचायत चे माजी सरपंच व विभागीय नेते रामचंद्र चितळकर, युवा नेते व खांब ग्रामपंचायत उप सरपंच मनोज शिर्के,रायगड जिल्हा कुणबी समाज समन्वय समितीचे सचिव शिवराम महाबळे,मारुती बुवा लोखंडे,रोहा तालुका माजी शिवसेना तालुका प्रमुख विष्णू लोखंडे,गणेश शिंदे,सुशिल शिंदे, मोरे, सतांबेकर,खराडे,तसेच वीरशैव माहेश्वर मंडळ रोहा सुधागड चे माजी अध्यक्ष अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ सदस्य व गोरीवले यांचे अत्यंत जिवलग सहकारी महेशस्वामी जंगम सह विविध स्तरावरील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व त्यांचे नातलग बहुसंख्येने अंतयात्रेसाठी जमले होते .
उमाजी गोरीवले यांच्या पश्चात यांच्या पत्नी एक मुलगा,पाच मुली,सून ,जावई, नातवंडे ,व मोठा गोरीवले परिवार आहे.त्यांच्या अंतसंस्कार प्रसंगी विविध समाजातील तसेच राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील समाज घटकांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील प्रवासाच्या दुःख भावना या प्रसंगी व्यक्त करत आदरांजली अर्पण केली.
त्यांचे पुढील दशक्रिया विधी रविवारी 2 जानेवारी व उत्तरकार्य मंगळवारी 4 जानेवारी 2022 रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी मौजे तिसे येथे संपन्न होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे .
खूप आयामी व्यक्तिमत्व होते.
ReplyDelete