दत्तजयंती उत्सव देवकान्हे- पिंपळवाडी येथे उत्साहात संपन्न
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
| कोलाड -श्याम लोखंडे
रोहा तालुक्यातील पिंपळवाडी- देवकान्हे येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या उत्सवानिमित्ताने श्री गुरू दत्तात्रेय जन्मोत्सव,सत्य नारायण महापुजा,सायंकाळी रोहा तालुका कोकणदिंडी वारकरी सांप्रदाय यांचे हरिपाठ व ह.भ.प.दिनेशमहाराज कडव यांचे सुश्राव्य हरिकिर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तर रात्री महाप्रसाद,महिलांसाठी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री दत्त जयंती निमित्ताने परिसरातील राजकीय,सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार,उद्योजक व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी कार्यक्रमास भेट देऊन दत्तप्रभुंचे दर्शन घेतले.
तर अनेक मान्यवर दानशुर व्यक्तींनी सढळ हस्ते कार्यक्रमासाठी अर्थिक व वस्तूरुप मदत केली.त्यांचे श्री दत्तगुरु मंडळाच्यावतीने आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पिंपळवाडी-देवकान्हे ग्रामस्थ, महिला व तरुण मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले .
Comments
Post a Comment