तळा नगरपंचायतीच्या दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

एकुण ७३.८२% मतदान, तर निकालासाठी १९ जानेवारी पर्यंत करावी लागणार प्रतिक्षा

| तळा - किशोर पितळे

तळा नगरपंचायतीच्या निवडणूकीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.राज्यातील १०५ नगरपंचायतीच्या निवडणुका आज २१ डिसेंबर २०२१ रोजी पार पडल्या.रायगडातील सहा नगरपंचायतीपैकी पाली-सुधागड नव निर्मिती झाली आहे.तळा, माणगांव,पोलादपूर,खालापूर,म्हसळा या नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. 

तळा नगरपंचायत ही शिवसेना पक्षाकडे आहे. तळ्यात एकुण मतदार ५९२९ असून स्त्री मतदार २९१९ व पुरूष ३०१० मतदार आहेत .१७ प्रभागापैकी १२ प्रभागात निवडणूक पार पडली.


शिवसेना ११ राष्ट्रवादी ९ भाजप ४ शेकाप २ मनसे ३ बहुजन वंचित आघाडी १ बहुजन समाजपार्टी १ अपक्ष ५ पैकी १ जागा बिनविरोध विजयी असे एकूण ३६ उमेदवार उभे होते. खरी लढत ही शिवसेना × राष्ट्रवादी ×भाजप यांच्यात होणार आहे.उमेदवार आपले नशीब आजमावणार असून या सर्व ३५ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले.



एकुण ७३.८२% मतदान झाले आहे .यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे.दरम्यान उपविभागीय पोलीस अधिक्षक महाड श्री. तांबे,तळा पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी प्रत्येक केंद्रावर भेटी देऊन सुरक्षा व्यवस्थेची पहाणी केली.या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नसून पोलीस यंत्रणा,राखीव पोलीस, होमगार्ड तैनात ठेवण्यात आले होते.मतदान शांतता सुव्यवस्थेत सुरळीतपणे पार पडले असून आता निकालाची वाट पहावी लागणार आहे.

Comments

Popular posts from this blog