देवकान्हे येथील मोफत अस्थिरोग तपासणीला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शंभरहून अधिक रुग्णांनी घेतला मोफत औषोधोपचाराचा लाभ
| कोलाड - श्याम लोखंडे
रोहा तालुक्यातील देवकान्हे येथे लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा आणि दिपक फाऊंडेशन रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रुप ग्रामपंचायत देवकान्हे यांच्या सहकार्याने डॉ.नमिता दिघे,डॉ.प्रशांत गोसावी,डॉ.स्नेहल शेलार,डॉ.विनोद गांधी,आशा तज्ञांमार्फत अस्थिरोग रुग्णांना प्राथमिक तपासणी तसेच त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले.
यावेळी लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाचे उपाध्यक्ष डॉ.मंगेश सानप,दिपक फाऊंडेशन अजय आवाडे, देवकान्हे ग्राम पंचायत चे उपसरपंच सूरज कचरे,सदस्य दयाराम भोईर,शाळेचे मुख्याध्यापक टिकुळे,लायन्स क्लब कोलाड चे सेक्रेटरी रविंद्र लोखंडे,खजिनदार डॉ श्यामभाऊ लोखंडे ,बोर्ड ऑफ डायरेक्टर अनिल महाडिक,लायन महेश तुपकर,राजेंदर कोप्पू,विश्वास निकम,सौ पूजा लोखंडे,दीपक फाऊंडेशनचे सहकारी अश्विनी ऐत,अक्षरा जाधव,नाजुका चौलकर,मारुती निगडे,मल्लेश हंचली,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वास थिटे,आशाताई,अंगणवाडी सेविका,मदतनीस,आदी मान्यवर व ग्रामस्थ,महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .
यावेळी फिजिओथेरपीस्ट तज्ञ डॉ.स्नेहल शेलार यांनी उपस्थित रुग्णांना संधीवात मणक्याचे आजार यावर योगाद्वारे प्रात्यक्षिक करत सखोल मार्गदर्शन केले.ऑर्थोपेडीक तज्ञ डॉ.गोसावी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की सर्वांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे,आहारात नेहमी पालेभाज्या व संक्रमित अन्नपदार्थ खावेत, पाणी भरपूर प्यावे इतर कामांच्या व्यापाबरोबरच व्मायायाकडे देखील तेवढेच लक्ष केंद्रित करावे असा मोलाचा सल्ला दिला.
दिपक फाऊंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा यांनी दुर्गम आणि ग्रामीण भागात आयोजित केलेल्या अस्थिरोग तपासणीत 150 हुन अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले.
Comments
Post a Comment