तळा नगरपंचायत ४ जागांचे आरक्षण जाहिर

दोन जागा महिलांसाठी राखीव तर दोन प्रभाग सर्वसाधारण

| तळा-किशोर पितळे 

तळा नगरपंचायतीची चार जागांसाठी सुधारीत आरक्षणाची सोडत गुरुवार दि. २३ डिसेंबर रोजी काढण्यात आली.यामध्ये दोन जागा या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत तर दोन जागा या सर्वसाधारण म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत.तळा नगरपंचायतीची मुदत गतवर्षीच संपली असून राज्य निवडणूक आयोगाने आरक्षणाची सुधारित सोडत काढण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता.त्यानुसार रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तळा नगरपंचायत सदस्यपदाची चार जागांसाठी सुधारित आरक्षण सोडत डॉ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृह पंचायत समिती तळा येथे पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार,तहसीलदार आण्णापा कनशेट्टी ,मुख्याधिकारी माधुरी मडके यांचे नियंत्रणाखाली काढण्यात आली आहे.

सुधारीत आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक १(पुसाटी,वडाची वाडी) सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र.३ (बामणघर,बौद्धवाडी,गौळवाडी) सर्वसाधारणमहिला,प्रभाग क्र.१०(सोनार आळी,फोंडळ आळी) सर्वसाधारण, प्रभाग क्र.१४(मेट मोहल्ला फोंडळवाडी) सर्वसाधारण अशी आरक्षणे पडली आहेत.नव्याने काढण्यात आलेल्या या आरक्षण सोडतीत महिलांना संधी देण्यात आली आहे.

 या चार जागांसाठी १८ जानेवारी २०२२ रोजी मतदान पार पडणार आहे.

Comments

Popular posts from this blog