नागोठणे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश पिंपळे यांनी शिवसेनेचे उमदेवार संजय पिंपळे यांचा केला 47 मतांनी पराभव 

 | नागोठणे-प्रतिनिधी

नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कै.शैलेंद्र देशपांडे यांच्या अकाली निधनाने झालेल्या रिक्त जागेसाठी दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी पोटनिवडणुक पार पडली.त्या निवडणुकीचे चित्र आज निकालातुन स्पष्ट झाले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश पिंपळे यांनी शिवसेनेचे उमदेवार संजय पिंपळे यांचा 47 मतांनी पराभव केला.


ह्या पोटनिवडणुकीत प्रभागातील एकूण 1308 मतदारांपैकी 988 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.झालेल्या मतदानानुसार राजेश पिंपळे यांना 513 मते तर संजय पिंपळे यांना 466 मते मिळाली आणि नऊ मतदारांनी नोटा म्हणजेच यापैकी नाहीला पसंती दिली.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार श्री.अनिकेत भाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे मधील जेष्ठ कार्यकर्त्यांनी आखलेल्या रणनितीला व राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांच्या मेहनतीला अखेर यश आले.शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य श्री.किशोरभाई जैन तसेच सरपंच आणि कार्यकर्त्यांनी मतदारांना केलेल्या आवाहनाला जनतेने नाकारले हे ह्या निकालावरुन स्पष्ट झाले.

आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ह्या निकालाचे महत्त्व अधोरेखीत होते.

ह्या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.तर शिवसेना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा घेण्यात अपयशी ठरल्यामुळे सेनेच्या प्रमुख नेत्यांवर आत्मपरिक्षणाची वेळ आली आहे.

Comments

Popular posts from this blog