लक्ष्मण पवार यांच्या अपघाती निधनाने पालेखुर्द गावावर दुःखाचे सावट

कर्तबगार तरुण गेल्याने कुटूंब झाले पोरके

| रोहा-शरद जाधव

आपल्या नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या पालेखुर्द येथील लक्ष्मण पवार या ३२ वर्षीय तरुणाला भीषण आपघातात आपला जीव गमवावा लागला.लग्न सोहळ्यातील आनंद फार काळ टिकला नाही.परतीच्या प्रवासात वडखळ येथे आल्यावर त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता कि यात लक्ष्मण पवार यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले कुटूंबीय जखमी झाले आहेत.यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.दरम्यान जखमी अत्यवस्थ अवस्थेत असल्याचे बोलले जात आहे.

लक्ष्मण पवार तरुण हा शांत, मनमिळाऊ, निर्व्यसनी म्हणून परिचित होता.धाटाव येथील निलिकाॕन कंपनीत तो कायम स्वरुपी कामगार म्हणून कार्यरत  होता.

       निधनाची वार्ता समजताच निलिकाॕन कंपनीचे अधिकारी,मित्र परिवार,नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्यने त्यांच्या घरी जाऊन कुटूंबीयांचे सांत्वन केले. 

      या दुर्दैवी घटनेसंबंधी माहिती देताना या गावचे सामाजिक कार्यकर्ते महेश ठाकुर यांनी संगितले की,हि अतिशय दुखःद घटना असुन लक्ष्मण पवार या तरुणाच्या जाण्याने संपुर्ण कुटुंब पोरके झाले आहे.या कुटुंबाला आता आधाराची गरज आहे. निलिकॉन कंपनीने एक आपला प्रामाणिक कामगार गमावला असुन या कंपनीने पवार कुटूंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे व त्यांना पाठबळ द्यावे अशी मागणी ठाकुर यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog