शिववंदना वाचनालय वाशी ता.रोहा यांच्यावतीने "वेध शिवविचारांचा" ह्या अभिनव उपक्रमाचे आयोजन
रोहा-प्रतिनिधी
शनिवार दिनांक डिसेंबर २०२१ रोजी शिववंदना वाचनालय वाशी ता.रोहा यांच्यावतीने "वेध शिवविचारांचा" ह्या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मागील पाच वर्षांपासून शिववंदनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
मागील उपक्रमांतुन आपण काय विचार घेतले?आपण काय शिकलो?याचा आढावा घेतला गेला.ह्या छोटेखानी ऊपक्रमात सर्व शिवकन्या आणि शिवप्रेमींनी उत्तम विचार मांडले.
कु.विक्रांती जोगडे,कु.गायत्री जंगम,कु.शर्वरी बर्डे,कु.प्रणाली भोईर इ.शिवकन्यांनी आपली मते परखडपणे मांडली.
शिवप्रेमी विक्रांत बाकाडे,आयुष बामणे,विराज बाकाडे,श्री.सौरभ खांडेकर यांनी उत्तम नियोजन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आर्यन बर्डे याने केले.
शिववंदना वाचनालय वाशी यांच्या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
छान उपक्रम 👌👌
ReplyDelete