कुंडलिका नागरी सहकारी पतसंस्थेचे भव्य नुतन वास्तूत पदार्पण 

केंद्र सरकारने सहकार खाते आपल्या आखत्यारित आणल्याने सहकार क्षेत्राला सुवर्णदिन येणार-खासदार विनय सहस्रबुद्धे

सर्व सोयी-सुविधायुक्त शंभर खाटांचे व खास महीलांसाठी सुसज्ज रुग्णालय आपल्या गावांसाठी लवकर मंजूर करून आणणारं-खासदार सुनिल तटकरे

| रोहा/अष्टमी-नरेश कुशवाहा

 रोहा तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यात सहकार क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात नाव लौकीक कमावलेल्या 28 वर्षे जनतेची अविरत सेवा करणारी कुंडलिका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित रोहाचा नूतन वास्तुचा उद्धघाटन सोहळा खासदार विनय सहस्रबुद्धे व खासदार सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.यावेळी त्यांच्या समवेत कुंडलिका पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी, उपाध्यक्ष विवेक वत्सराज ,सहायक निबंधक तुषार लाटणे , सुमुख कुलकर्णी, चार्टर्ड अकाउंटट सतीश मेडी ,सुमुख कुलकर्णी , कमल नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे आदी उपस्थित होते.


प्रास्तविक कुंडलिका पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी केले व सुत्र संचालन व आभार प्रदर्शन अशोक जोशी यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन उत्तम प्रकारे केले ते   संचालक मंडळाचे  अनिल आठवले ,  प्रल्हाद भाटे, संजीव कवितके, अशोक जोशी, पुरूषोत्तम कुंटे , प्रमोद काळवीट , माधव दाते , विवेक रावकर , जयश्री भांड धनश्री बापट , रमेश वाघमारे , अविनाश दाते    व सर्व कर्मचारी वृंद यांनी केले व विशेष परिश्रम संस्थेचे व्यवस्थापक प्रमोद फुलारे यांनी घेतले या कार्यक्रमास  भारी संख्येने रोहेकर नागरिक उपस्थित होते.

या वेळी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी सहकार क्षेत्रा बाबत केंद्र सरकारच्या धोरणा विषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की केंद्र सरकारने सहकार क्षेत्राची विकट परिस्थिती पाहता  माननीय अमीत शहांच्या अध्यक्षतेखाली केंद्रात सहकार क्षेत्राचा एक वेगळा खाता सूरु केला आहे त्या मुळे पुढील काळात सहकार क्षेत्राला नक्कीच  सुवर्ण दिवस येतील  त्यांनी सहकार क्षेत्रात महिलांच्या सहभाग विषयी विशेष कौतुक केले   व पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत संस्था 28 वर्षे वेगवान प्रगती करत आहे  असे म्हणत सर्वांचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ‌.


खासदार सुनील तटकरे आपल्या भाषणात म्हणाले रोहा सारखे छोट्या गावात कुंडलिका पतसंस्थेचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे त्या बाबतीत त्यांनी सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाच्या कार्या बदल कौतुक केले तसेच खेळीमेळीच्या वातावरणात जिल्ह्यात शहरात येणाऱ्या नवीन योजना बाबतीत उपस्थितांचे मार्गदर्शन करताना ते म्हणाले लवकरच जिल्ह्यात सर्व सोयी सुविधा युक्त 100 खाटंचे व  आपल्या गावात 50 खाटंचे महीलांसाठी सुसज्ज रुग्णालय आणण्यासाठी फाईल तयार करून मुख्यमंत्री जवळ दिली आहे पण त्यांची तब्येत बिघडल्या मुळे थोडा उशीर झाला आहे आत्ता दहा पंधरा दिवसात ती मंजूर होऊन नीधी ही नक्कीच उपलब्ध होईल हे दोन्ही रुग्णालय झाले नंतर येथील रुग्णांना उपचारासाठी मुंबई आदी ठिकाणी जावे लागणार नाही   ते पुढे म्हणाले  आज कुंडलिका पतसंस्था ही  भव्य दिव्य इमारतींत प्रवेश करत आहे त्या बद्दल व पुढील वाटचालीस माझ्या  शुभेच्छा  आहेत .

प्रस्ताविक भाषणात संस्थेचे अध्यक्षांनी सांगितले  की  आमची संस्था वनवासी कल्याण आश्रम, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ज्ञान गंगा बहूविकलांग संस्था, श्री राम जन्मभूमी , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, मुख्यमंत्री सहाय्यता निधी (कोविड 19) व इतर सामाजिक क्षेत्रात नेहमी खारीचा वाटा उचलत असते त्यानी सुद्धा सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog