कुणबी युवक सोनगांव ग्रुप संघटना पुन्हा सक्रिय

जुन्या-जाणत्या समाज नेत्यांकडून स्वागत


|रोहा-शरद जाधव

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न रोहे तालुका कुणबी समाज अंतर्गत सोनगांव कुणबी ग्रुप आपल्या ग्रुपमध्ये व तालुक्यात सामाजिक कार्य करण्यास पुन्हा सक्रिय झाला आहे.समाजकार्यासाठी तरूण युवा पिढी जोमाने कामाला लागली असल्याचे दिसून येत आहे.

      रोहे तालुक्यात बहुसंख्येने असलेला कुणबी समाज आज सर्वच बाबतीत पुढारलेला दिसून येत आहे.पुर्वाश्रमीच्या समाजनेत्यांनी संघटनेचे रोपटे लावाले.त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. समाजाचे कार्य व्यापक गतीने पुढे घेऊन जाण्यासाठी कुणबी युवक आता पुढे येत आहेत. सोनगांव विभागात युवा संघटनेला आलेली मरगळ दूर सारून युवावर्ग नव्या जोमाने सामाजिक कार्यात सक्रिय झाला आहे.जुन्या जाणत्या समाज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील तरूण पिढी सामाजिक कार्यात पुढे येऊन गावागावात गाठीभेटी घेताना दिसत आहेत.सध्या रोहे तालुक्यात राजकारणाचा प्रचंड बोलबाला सुरु आहे.नव्या दमा चे  तरुण,यूवा नेत्यांकडे आकर्षित होत आहेत.असे असले तरी राजकारण विरहित गावाची समाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे. समाजाचे ऋण फेडणे गरजेचे आहे. याकरिता संघटन गुण अंगी असलेले कुणबी तरुण पुढे येत आहेत हे मोलाचे आहे.

      सोनगांव सारख्या ग्रामीण भागात समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा एकदा तरुण वर्ग पुढे सरसावला आहे. तरुण वर्गात नवचेतना निर्माण झाली आहे. सध्याचा यूवावर्ग हा सुशिक्षित व पुढारलेला आहे त्यामुळे पुर्वीपेक्षा समाजसंघटन निश्चित जोमाने उभे राहिल अशी आशा व्यक्त होत आहे. भविष्यातील समाजाचे प्रश्न सोडवण्याकरिता एक सामाजिक नेतृत्व तयार होणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे. युवकांनी टाकलेले एक पाऊल समाजाच्या प्रगतीच्या द्दृष्टीने हितावह असल्याची प्रतिक्रिया जुन्या जाणत्या समाजनेत्यांकडून व्यक्त होऊ लागली आहे. 

सोनगांव विभागातील तरूणांच्या समाजसंघटनेचे कौतुक होत असतानाच त्यांच्या सामाजिक योगदानाची रोहा तालुका कुणबी समाजसंघटनेस प्रतिक्षा आहे.

Comments

Popular posts from this blog