परोपकारी लक्ष्मीबाई म्हस्के यांचे अल्पशा आजाराने निधन

पत्रकार केशव म्हस्के यांना मातृशोक

रोहा-प्रतिनिधी

 रोहा तालुक्यातील खारगाव ग्रामपंचायत हद्दीतील मौजे खारी-काजुवाडी(दामाणी नगर) येथील रहिवाशी लक्ष्मीबाई रघुनाथ म्हस्के यांचे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बुधवार दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ०३:०८ वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले.

    त्यांच्या निधनाची वार्ता समजताच रोहा-आरे दशक्रोशीमध्ये शोककला पसरली आहे.त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

       त्यांच्या पश्चात तीन मुलगे,तीन मुली,सूना, जावई,नातवंडे,पतवांडे असा मोठा परिवार आहे दररोज सायंकाळी "हरिपाठ"आणि"स्वर्गरोहण" या धार्मिक ग्रंथाचे पारायण सुरु असून त्यांचे दशक्रियाविधी शुक्रवार दि.३१ डिसेंबर रोजी सकाळी ०९:०० ते ११:०० वाजेपर्यंत स्वयंभू श्री शिवालय मंदिर काजुवाडी येथे होतील. तर अंतिम धार्मिक विधी बारावे रविवार दि.०२ जानेवारी २०२२ रोजी राहत्या घरी होतील.

  याप्रसंगी रायगड भूषण गुरुवर्य ह.भ.प.मारुती महाराज कोलाटकर(तळवली तर्फे अष्टमी) यांची किर्तनसेवा सकाळी १०:०० ते १२:०० वाजे पर्यंतच्या दरम्यान होणार आहे.

      याप्रसंगी कुणबी समाजाचे जेष्ठ समाज नेते सुरेश मगर,सरपंच वसंत भोईर,उपसरपंच नितीन मालुसरे,माजी सरपंच सहादेव महाडिक,पांडुरंग मातेरे,गावचे अध्यक्ष दत्तात्रेय काळे,पोलिस पाटील हरिश्चंद्र मालुसरे,पांडुरंग दिसले,मोरेश्वर काळे,मोरेश्वर भोईर, हभप.बाळाराम महाराज शेळके,हभप.अनिल सानप,नारायण भोईर,मनोहर पाडगे,राजेंद्र म्हसकर,नथुराम भिलारे,पत्रकार नंदकुमार मरवडे सर ,सतेज आपणकर,दिलीप खिरिट,काशिनाथ लहाने, लीलाधर खिरिट आदी आजी - माजी सरपंच,सचिव,सदस्य आदी सामाजिक,शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर ग्रामस्थ मंडळींसह आप्तस्वकीय मित्र परिवार व सगेसोयरे,नातेवाईक मंडळींनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेत त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.

  कोरोना विषाणू संसर्गाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या प्रचलित नियमांचे पालन करून कमीत - कमी नातेवाईकांच्या उपस्थितांमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार विधी करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog