पुष्कर राजस्थान येथील राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र पॅरा कबड्डी संघ द्वितीय तर

मुंबई पॅरा कब्बडी संघ तृतीय

तळा: किशोर पितळे
पुष्कर,राज्यस्थान येथे पार पडलेल्या,माजी मुख्यमंत्री जनार्दनसिंह गहलोत याच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय पॅरा कब्बडी स्पर्धेत स्पर्धेत महाराष्ट्र व मुंबई पॅरा कब्बडी संघाने चांगली कामगिरी करत आज महाराष्ट्र दिव्यांग कब्बडी संघ द्वितीय तर मुंबई दिव्यांग कब्बडी संघाने तृतीय स्थान प्रस्थापित केले.
 अंतिम फेरीतील महाराष्ट्र व राजस्थान या संघाच्या चुरसीच्या सामन्यात राजस्थान संघाने महाराष्ट्र संघास ४१-४० अशा फरकाने प्रथम क्रमांकाचे स्थान व महाराष्ट्राने द्वितीय क्रमांकाचे स्थान पटकाविले तर मुंबई संघ आणि राजस्थान संघाच्या उपांत्य  सामन्यांत राजस्थान संघाने मुंबई संघास ४७-३८ या फरकाने हरविले. गुणांनुसार मुंबई संघाने तृतीय स्थान व पंजाब संघास चतुर्थ स्थान प्राप्त केले महाराष्ट्र संघाकडून रायगड जिल्ह्यातील राजेश मोकल, अक्षय निकम, ओमकार महाडिक व कर्णधार रमेश संकपाळ, मुकुल खाडे नंदुरबार जिल्ह्यातील महेश वसावे, सांगली जिल्ह्यातील आरिफ शेख नंदुरबार जिल्ह्यातील रायसिंग वसावे,सांगली जिल्ह्यातील ज्योतिराम कदम रायगड जिल्ह्यातील कर्णधार मंगेश म्हात्रे,गणेश पाटील यांनीउत्तम कामगिरी केली.पेण तालुक्यातील कारवी गावातील राजेश मोकल यास बेस्ट रायडर म्हणून पारितोषिक देण्यात आले तर रोहा तालुक्यातील अक्षय निकम याने ही चांगली कामगिरी केली आहे.या संघाला कुलाबा दिव्यांग क्रिडा असोसिएशन महाराष्ट्र चे अध्यक्ष शशांक हिरवे, व सचिव शिवाजी पाटील, गडब गावातील माजी सरपंच नितिन पाटील, रमेश म्हात्रे, अजय म्हात्रे,मनोज म्हात्रे, अतुल पाटील, संकल्प अपंग संघचे सचिव बाबाराव धोत्रे,बाबु सय्यद मुंबई यांनी सहकार्य केले.दिव्यांग व्यक्ती क्रीडा क्षेत्रात देखील कमी नाही.ईच्छा शक्तीच्या बळावर विजय प्राप्त करू शकतो हे समाजाला दाखवून दिले आहे.असे कुलाबा दिव्यांग क्रिडा असोसिएशन महाराष्ट्र व सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रोहा रायगडचे सचिव व दोन्ही संघाचे व्यवस्थापक शिवाजी पाटील यांनी गौरवाप्रसंगी मनोगतात व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना राज्याध्यक्ष साईनाथ पवार यांनी खास अभिनंदन केले आहे.सर्व स्तरावर या संघाचे व दिव्यांगाचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog