अजय बिरवटकर यांची महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट अध्यक्ष पदी निवड.

तळा- संजय रिकामे

                           महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट या संस्थेच्या विश्वस्तांची पंचवार्षिक निवडणूक २० ऑगस्ट २०२३ रोजी श्रीकृष्ण सभागृह दादर मुंबई येथे पार पडली या निवडणुकी मध्ये श्रीकृष्ण पॅनलचे सर्वच्या सर्व १७ उमेदवार यांनी दणदणीत विजय मिळवला या विजयी उमेदवारांंनी मिळून दि- २१ ऑगस्ट २०२३ रोजी अध्यक्ष पदी अजय शांताराम बिरवटकर व उपाध्यक्षपदी युवराज गवळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.बिरवटकर हे मन मिळावू शांत स्वभाव अभ्यासू व नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत असल्याने त्यांची महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट शिखर संस्था अध्यक्ष पदी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे वर अभिनदंन होत आहे.संपूर्ण गवळी समाजाला एकत्रित करण्याचे काम आम्ही करणार असून समाजाच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम राबविण्यावर आमचा अधिक भर असणार आहे. समाजाच्या समस्या सोडविण्या बरोबरच युवकांशी संपर्क साधून त्यांना समाजकार्यासाठी जोडण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे नव नियुक्त अध्यक्ष अजय बिरवटकर यांनी म्हटले आहे.                 


               
          
महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट कार्यकारणी बिनविरोध निवड करण्यासाठी सामूहिक निर्णय झाल्याने कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली. कार्यकारणीमधे अध्यक्षपदी अजय बिरवटकर, उपाध्यक्षपदी युवराज गवळी, सरचिटणीसपदी उदय पाटील,खजिनदार पदी मिलिंद दर्गे, सरचिटणीसपदी प्रकाश गवळी,विश्वस्त पदी प्रदीप धुमाळ,अविनाश कांबळे,चंद्रकांत चिले,प्रसाद रिकामे,प्रकाश रिकामे,विजय गवळी,बापूसाहेब चिले,बाबाजी रिकामे,नितीन ठसाळे,प्रीती खताते,सुप्रिया पागार असा पदभार देण्यात आला आहे.अजय बिरवटकर,पदाधिकारी, विश्वस्त त्यांच्यावर महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog