श्रीमती ईन्दुमती वसंतलाल शाह चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे मोफत वह्या वाटप व वृक्ष लागवड उत्साहात संपन्न

तळा- संजय रिकामे

                          अशोक लोखंडे विद्यामंदिर पिटसई येथे समाजसेवक गणेश बाळाराम सावंत यांच्या सहकार्याने श्रीमती ईन्दुमती वसंतलाल शाह चॅरीटेबल ट्रस्ट संस्थापक स्वर्गीय ईन्दुमती वसंतलाल शाह व स्वर्गीय वसंतलाल मणिलाल शाह यांच्या स्मरणार्थ ट्रस्टचे अध्यक्ष उमेश वसंतलाल शाह ,सचिव सौ.संध्या उमेश शाह यांच्याकडून विनामूल्य वह्यांचे आणि टीशर्टचे वाटप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला. या प्रसंगी अशोक लोखंडे विद्यामंदिर पिटसईचे चेअरमन खेळू वाजे,समाजसेवक गणेश सावंत सचिव संजय रेडिज,मुख्याध्यापक श्री रेडीज,रसिका पवार शिक्षक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

श्रीमती ईन्दुमती वसंतलाल शाह चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उमेश वसंतलाल शाह यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण, वैद्यकीय मदत, गोशाळेचे सामाजिक उपक्रम आणि इतर धर्मादाय गोष्टींसाठी ट्रस्ट गेली 13 वर्षे काम करत असल्याचे समाजसेवक गणेश सावंत यांनी सांगितले त्याचप्रमाणे ट्रस्टने दारिद्र्यरेषेखालील अनेक जीवघेण्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत केली आहे, अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आहे, मानसिकदृष्ट्या सेवानिवृत्त मुलांसाठी काम करणाऱ्या इतर ट्रस्टला देणगी देखील दिली असल्याचे त्यांनी सांगितले.बालकांवर सुसंस्कार घडविणे आणि शिक्षणात मदत करणे या अनुषंगाने नेहमी ट्रस्ट कडून मदत केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

                   
     चेअरमन खेळू वाजे यांनी कुठल्याही प्रकारची ओळख नसताना या भागातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना गणेश सावंत यांच्या सहकार्याने श्रीमती ईन्दुमती वसंतलाल शाह चॅरीटेबल ट्रस्ट कडून शिक्षणासाठी मदत म्हणून मोफत १८०० वह्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याला टीशर्ट  वाटप करण्यात आले खरोखरच आम्ही तुमचे खूप आभारी असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.खुळपे यांनी केले वह्या वाटप नंतर वृक्ष लागवड देखील करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरवातीला गणेश सावंत आणि रसिका पवार यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.युवा अनस्टोबेल ट्रस्ट (अहमदाबाद) गुगल क्लाससाठी  वर्षभर योगदान देणाऱ्या संगणक शिक्षिका सौ. वरंडे यांचा देखील सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog