किरण धनवी एक दानशूर व्यक्तिमत्व

        किरण धनवी हे एक मराठी उद्योजक म्हणून रोह्यात ओळखले जातात .दत्ताराम धनवी हे त्यांचे वडील. दत्ताराम धनवी यांनी पंचक्रोशीतील मंदिरे बांधली,दानधर्म केले परंतु या गोष्टीचा कुठेही बोलबाला कधीच केला नाही. प्रसिद्धीपासून ते लांबच राहत,मानसन्मान याची कधीही अपेक्षा त्यांनी केली नाही. गावातील, पंचक्रोशीतील कोणीही व्यक्ती आजारी पडल्यास त्याला पहिली मदत ते करत असत.

         वडिलांनी चालवलेला हा वारसा किरण धनवी यांनी पुढे चालवला. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय त्यानी पुढे नेला. रोह्यात नावाजलेला बिल्डर म्हणून त्याची ओळख आहे. वडिलांनी संपूर्ण जबाबदारी आपल्या मुलावर सोपवली आणि ती जबाबदारी किरण धनवी यांनी उत्कृष्टपणे सांभाळली देखील परंतु रोहा तालुक्यातील धामणसई परिसरात जादूटोणासारखा अघोरी प्रकार घडला होता.ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटले त्यानंतर गावागावात नागरिकांत चर्चा सुरू झाली.अनेकांनी या घडलेल्या घटने संदर्भात निषेध व्यक्त केला. मतमतांतरे झाली या घटनेनंतर चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटू लागल्या. पंचक्रोशीतील प्रतिष्ठित व्यक्तींनी यावर प्रतिक्रिया दिल्या यावेळी उडदवणे, सांगडे, मुठवली, मालसई, गावठाण व अन्य गावातील ग्रामस्थांनी घडलेल्या जादूटोणा सारख्या प्रकाराचा जाहीर निषेध व्यक्त केला.


                 धनवी परिवार एक दानशूर परिवार आहे. किरण धनवी हे पैशाचा पाऊस पाडणारे मास्टर माईंड हे चुकीचे विधान आहे. त्यांच्यावर आई-वडिलांचे चांगले संस्कार झालेले आहेत.उडदवणे पासून पिंगळसई पर्यंत त्यांनी मंदिरे बांधून दानधर्म केलेला आहे. रोह्यात एक नावाजलेले बिल्डर म्हणून त्याची ओळख आहे. काही लोक त्याची नाहक बदनामी करत आहेत. चांगल्या व्यक्तीची चांगल्या परिवाराची बदनामी थांबवा असे मत घनश्याम कराळे यांनी व्यक्त केले.

               हे परिवार दान करणारे आहे कोणाकडून घेणारे नाही वारकरी संप्रदायातील हे परिवार आहे. धनवी परिवाराला पैशांचा मोह नाही.ते नेहमीच सेवाभावी वृत्तीने मदतीचा हात पुढे करत आले आहेत धनवी परिवाराला काही असंतुष्ट मंडळी जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा या भावना अनेकांनी व्यक्त केला यामध्ये जेष्ठ नागरिकांनी तरुणांनी आपले अनुभव सांगत मत व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog