सहयोगी अपंग कल्याणकारी संस्थेचे वतीने शैक्षणिक साहित्य वाटप... खारी /रोहा (केशव म्हस्के)२८ ऑगस्ट :-


               रोहे तालुक्यातील  सहयोगी अपंग कल्याणकारी संस्थेचे धडाडीचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, अभ्यासु उपाध्यक्ष नंदलाल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग अपंग व्यक्ती करिता सातत्याने शासन दरबारी अपंगांसाठीच्या कल्याणकारी योजनांची यशस्वीरित्या अंमलबजावणी व्हावी आणि त्याचा लाभ दुर्गम तळागाळातील दिव्यांग व्यक्तींना मिळावा आदी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये क्रियाशील व कार्यशील असणाऱ्या सहयोगी अपंग कल्याणकारी संस्थेच्या वतीने रविवार दि.२७ ऑगस्ट रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर बाजार पेठ रोहा येथे शहरासह ग्रामीण भागातील दिव्यांग विद्यार्थांना व दिव्यांग व्यक्तींच्या पाल्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले..


   यावेळी दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली व सहकार्याने जिल्ह्यातील विविध अपंग संघटनांच्या माध्यमातून ०२ ऑगस्ट रोजी मोर्चा दरम्यान मंत्रालयीन सचिवांकडे संजय गांधी नि.यो.पेन्शन वाढ करून ५०००/- रुपये करणे, दिव्यांगाना पेट्रोल ५०% ,विजकर लाईटबिल ५०% सवलत,एस. टी. मध्ये राखीव सीट्स उपलब्ध करून देणे,अंत्योदय शिधा पत्रिकेचा लाभ देणे.आदी २१ मागण्यांमध्ये प्रामुख्याने अपंग व्यक्तींना निर्वाह मासिक भत्ता ५०००/-(पाच हजार रुपये) आदी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले दिव्यांगाकरिता पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा त्यांचे न्याय हक्क अधिकार शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्या त्वरित मंजूर न झाल्यास येत्या ०४ सप्टेंबर रोजी मुंबई आझाद मैदानावर अमरण उपोषण करणार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले यास सहयोग अपंग (दिव्यांग )कल्याणकारी संस्थेचे उपाध्यक्ष नंदलाल गुप्ता यांनी ही दुजोरा देत अपंगांच्या मूलभूत प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्याचं पाहिजेत त्यांना न्याय हक्क मिळालेच पाहिजेत, 

        याप्रसंगी दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.पाटील यांच्या समवेत पेण येथील पतसंस्थेचे राजु वाघमारे,नैसर्गिक आपत्तीचा प्रसंगी मेडिकल,पुनर्वसन आदी विविध उपक्रमांमध्ये मदतकार्यात अग्रेसर असलेल्या बस संस्थेचे उपाध्यक्ष गणेश महामुणकर,तालुक्यातील दानशूर संघटना भारतीय जैन संघटनेचे मोतीशेठ जैन, माजी नगरसेवक महेंद्र गुजर,अध्यक्ष पप्पू शेठ सोलंकी,उपाध्यक्ष सुनील कोठारी,सागर कोठारी, विजया प्रकाश कोठारी समाज क्रांती संघटनेचे प्रल्हाद घेवदे,जिल्हा सचिव किशोर पाटील,अलिबाग तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, अध्यक्ष राजेश कांबळे,उपाध्यक्ष नंदलाल गुप्ता,शिवाजी मुटके,पत्रकार नंदकुमार मरवडे,केशव म्हस्के आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थांना व पाल्यांना रजिस्टर,टिफीन बॉक्स,पेन,कॅप,आदी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.

      सहयोग अपंग (दिव्यांग )कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष राजेश कांबळे,उपाध्यक्ष नंदलाल गुप्ता,सचिव रमेश खराडे,खजिनदार संजय गौतम टि. टी. किरण मोहिते,सह खजिनदार निवृत्ती सुर्वे,चंद्रकांत संसारे,शिवाजी मुटके, प्रदिप रटाटे, सुरेश शेडगे,सुनिल दळवी, स्मिता विजय गजमल,जयश्री पुजारी,वैशाली पवार,सुवर्णा मांगले आदी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळीसह विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते..

     सदरील कार्यक्रमाचे प्रस्तावना व  सूत्रसंचालन संतोष करडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अध्यक्ष राजेश कांबळे,सेक्रेटरी रमेश खराडे यांनी मानले...दिव्यांग विद्यार्थांना व पाल्यांना रजिस्टर,टिफीन बॉक्स,पेन,कॅप,आदी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करताना दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.पाटील यांच्या समवेत पेण येथील पतसंस्थेचे   गणेश महामुणकर,भारतीय जैन संघटनेचे मोतीशेठ जैन, माजी नगरसेवक महेंद्र गुजर, सुनील कोठारी, समाज क्रांती संघटनेचे प्रल्हाद घेवदे,जिल्हा सचिव किशोर पाटील,अलिबाग तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील,अध्यक्ष राजेश कांबळे,उपाध्यक्ष नंदलाल गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog