कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहाच्या  वतीने मासिक सभा व कवी संमेलन उत्साहात संपन्न



रोहा प्रतिनिधी 

                                  २४ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहाच्या वतीने मासिक सभा व कवी संमेलन आयोजित करण्यात आले . कु नेहल प्रधान यांच्या निवासस्थानी सदर सभा संपन्न झाली . सभेचे अध्यक्षस्थान  शाखेच्या उपाध्यक्ष आरती धारप यांनी स्वीकारावे असे सचिव श्री विजय दिवकर यांनी सुचित केले आणि श्री .नारायण पानवकर यांनी अनुमोदन दिले .


 सभेला सुरुवात करण्यापूर्वी रानकवी ना धो महानोर तसेच मराठी चित्रपट अभिनेत्रीं सीमा देव यांना सुद्धा  कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेच्या वतीने  श्रद्धांजली वाहण्यात आली .  लगेचच सभेला सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम सभेचा अहवाल व जमाखर्च सचिव श्री .विजय दिवकर यांनी वाचून दाखवला तो सर्वांनुमते मंजूर करण्यात आला . पुढील विषय नवीन सभासद करणेबाबत घेण्यात आला .

 सभेनंतर कवी संमेलन आयोजित करण्यात आले .

  विषय - स्वर्गीय ना धों महानोर यांच्या कविता व  गाणी .

                      कवी संमेलनाला सुरुवात स्वर्गीय महानोर यांच्या कवितेने श्री रंजीत गायकवाड यांनी  केली . नंतर भरत चौधरीसर यांनी कवी ना धो महानोर यांच्या जीवन प्रवासाबद्दल माहिती सांगितली .   पुढे अजित पाशिलकर यांनी महानोर यांच्यावर एक कविता तयार करून  सादर केली .

 श्री नारायण पानवकर  यांनी  ना धों.महानोर यांची जैत्र जैत चित्रपटांमधील असं एखादं पाखरू झिम्माड या गीताचे  गायन केले . कु नेहल प्रधान ,श्री . शरद कदम , श्री विजय दिवकर यांनी सुद्धा कवितांचे वाचन केले, अध्यक्षीय भाषणात सौ.आरती धारप यांनी स्व.ना.धो.महानोर यांच्या विषयी सविस्तर माहिती,व आठवणी सांगितल्या.

 शेवटी सभेचे आभार श्री रंजीत गायकवाड यांनी व्यक्त केले .  या कार्यक्रमासाठी उत्तम व्यवस्था केलेल्या नेहल प्रधान व त्यांच्या आईचे सुद्धा आभार मानले व सभा संपन्न झाली असे जाहीर करण्यात आले .

Comments

Popular posts from this blog