तळा शहरात पोलिसांचा रुट मार्च

तळा-संजय रिकामे

                   कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व्यवस्था सुरळीत राहावा यासाठी तळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रुट मार्च काढण्यात आला.बुधवारी सायं पाच वाजता तळा पोलिसांच्या पथकाकडून रुट मार्च काढण्यात आला.यात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.पोंडफुले,तळा पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे, माणगाव पोलीस निरीक्षक श्री.पाटील सहपोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, ५० पोलिस अंमलदार, महिला पोलिस अंमलदार, बीट मार्शल यांचा समावेश होता. तळा पोलिस ठाणे ते बळीचा नाका, बाजारपेठ,तळा नगरपंचायत कार्यालय,वरचा मोहल्ला,कासार अळी,तळा प्राथमिक आरोग्य केंद्र,ते पुन्हा तळा पोलिस ठाण्यापर्यंत हा रुट मार्च काढण्यात आला. या रुट मार्चमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी पोंडफुले यांनी स्वतः नेतृत्व केले.                     

               तळा शहरामध्ये पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात येत आहे या मागचा उद्देश हा एकच आहे की तळा येथील सर्व नागरिकांनी शांततेने आणि आनंदाने रहावे कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव न येता सर्वांचा सलोखा अबाधित रहावा या उद्देशाने आम्ही नागरिकांना संदेश देत आहोत की,आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आणि कुठल्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार कोणाकडून होणार नाही झालाच तर आम्हाला कळवावा हा त्या मागचा उद्देश आहे नजीकच्या काळामध्ये दही हंडी गणपती उत्सत्व धार्मिक सण आणि उत्सव येणार आहेत त्या अनुषंगाने हा रुट मार्च काढण्यात आला असल्याचे तळा पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी यावेळी सांगितले.पोलिसांची कारवाई चांगल्या प्रकारची आणि सुस्थितीत असून कुठल्याही प्रकारचा गंभीर गुन्हा गैरकृत्य सहन करणार नाही हा संदेश देखील नागरिकांमध्ये जावा यासाठी हा रूट मार्च काढला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Comments

Popular posts from this blog