आत्मा योजने मार्फत शेतकऱ्यांना मत्स्य बीजाचे वाटप


 

तळा संजय रिकामे

                              तळा तालुक्यामध्ये कृषी विभागाकडून वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतला आहे परंतु सदर शेततळ्यांचा वापर शेतीच्या पाण्याची गरज भागवणे इतपर्यंतच सिमित होते यामध्ये  बदल करण्यासाठी व शासनाचा शेती व शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे व आर्थिक स्तर उंचावणे हा मुख्य हेतू नजरेसमोर ठेवून कृषी विभाग व आत्मा मार्फत तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांच्या विशेष प्रयत्नातून १४ शेतकरी बांधवांना ७००० रोहू व ७००० कटला या जातीचे बोटुकली मत्स्य बीज  वाटप तालुका कृषी अधिकारी आनंद कंबळे यांच्या हस्ते करण्यात आले . 


                                                                                          मत्स्य बीजाचे संगोपन व संवर्धन कसे करावे त्यांना खाद्य कोणते व कसे द्यावे या विषयी विस्तृत माहिती आनंद कांबळे यांनी दिली.या मत्स्य बीज वाटपाचे लाभार्थी म्हणून सुरेश महादेव कदम- साळशेत, रविंद्र गणपत मांडवकर - वाशी महागाव, सुमित्रा कृष्णा कडू- बारपे,नारायण देऊ चाळके - बेलघर,सुभाष अमृता आंबरले - बेलघर,चंद्रकांत बंधू सावंत - बेलघर , रघुनाथ तुकाराम शिंदे - रोवळा , रमेश बाळाजी ताम्हणकर - वाशी हवेली, सुरेश सखाराम कजबले - कुंबेट अब्दुल रहाटविलकर-वावे मंद्रज, लक्ष्मण हरी ठमके मालाठे ,हरिश्चंद्र देवजी लोखंडे  मालाठे,जनार्दन विठोबा अंबारले-बेलघर,मुकुल धनप्रकाश बन्सल यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव, कृषी अधिकारी, सुनील गोसावी,आत्मा बीटीम सचिन लोखंडे व कृषी सहायक, कार्यालय कर्मचाऱ्यी तसेच शेतकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog