नाना नानी पार्कचे होणार सुशोभीकरण! विरोधी पक्ष नेत्या नेहा पांढरकामे यांच्या हस्ते भूमिपूजनतळा संजय रिकामे


                नाना-नानी पार्क तळा शहराची शान असून आबालवृध्दांसाठी हे ‎विरंगुळ्याचे ठिकाण असून लहान मुलांना खेळण्यासाठी बरीच ‎खेळणी सुध्दा आहेत.या नाना नानी पार्कची डागडुजी करण्याची मागणी तळेवासियांनी केली होती त्या अनुषंगाने नगरसेवकांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती.आ.भरतशेट गोगावले, जिल्हा प्रमुख  प्रमोद घोसाळकर यांच्या पाठपुराव्याने तळा शहरातील नाना पार्कसाठी 7 लाख रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन विरोधी पक्ष नेत्या सौ.नेहा पांढरकामे यांच्या हस्ते आज पडले   


                                

                                यावेळी तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ,शहरप्रमुख राकेश वडके,जिल्हा कोअर कमिटी सदस्य लीलाधर खातु,तालुका सपंर्क ॲड. चेतन चव्हाण,नगरसेवक मंगेश शिगवण, नगरसेवक नरेश सुर्वे, सिराज खाचे, मंगेश पोळेकर, भास्कर गोळे अविनाश पिसाळ युवासेना तालुका प्रमुख अनंत खराडे उपतालुका प्रमुख शरद सारगे  तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog