जल्लोष! चांद्रयान मोहीम यशस्वी होताच तळा येथे ढोल ताशांचा घुमाला आवाज
तळा-संजय रिकामे
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान ३ या मोहिमेकडे लागलं होत.चांद्रयान ३ हे काल संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरले.विक्रम लॅंडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले.भारताची चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यावर सर्वत्र जल्लोष साजरा केला जाऊ लागला. चांद्रयान मोहिम फत्ते झाल्यावर देशभरात आनंद साजरा केला जाऊ लागला.अनेक जण इस्रोला शुभेच्छा देत आहेत. तळा शहरातही नागरिकांनी इस्रोचे कौतुक करत ढोल ताशांच्या गजरात जोरदार जल्लोष केला.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान ३ उतरताच तळा येथे फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. इस्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेत काल सायंकाळी अखेरचा व महत्वाचा टप्पा होता. हा दुर्मिळ क्षण अनेक नागरिक समाज माध्यमांसह दूरचित्रवाणीवर पाहत होते.चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताच तरुणांनी रस्त्यावर उतरत फटाक्यांची आतषबाजी करत भारत माता की जयच्या घोषणा देत शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत जल्लोष केला. यावेळी पेढे देखील वाटण्यात आले. बाजारपेठे बळीचा नाका येथे व्यापारी वर्ग,विविध पक्षाचे प्रमुख प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment