भाजपाला मुरुड मध्ये मोठा धक्का! -भाजपा उप तालुका प्रमुख परेश किल्लेकर यांचा असंख्य कार्यकर्ते महिला भगिनीसह उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटात जाहीर प्रवेश...



शिवसेना भवन मुंबई येथे माजी मंत्री खासदार आनंत गीते यांच्या हस्ते जाहीर प्रवेश- युवासेना उपजिल्हाधिकारी पदाची दिली जबाबदारी...


परेश किल्लेकर यांनी भाजप सोडल्याने भाजपाचे मुरुड मधील अस्तित्व शून्य? मुरुड मध्ये चर्चेला उधान...


प्नतिनिधी दीप वायडेकर.

                     मुरुडचे भाजपा उपतालुकाप्रमुख परेश किल्लेेकर यांनी काल दिनांक 24 ऑगस्ट रोजी भाजपा पक्षाला रामराम ठोकत शिवसेना भवन मुंबई येथे जाऊन रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र दादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री खासदार अनंत गीते यांच्या हस्ते असंख्य कार्यकर्त्या महिला भगिनींसह उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटात जाहीर प्रवेश केला. भाजपा पक्षांतर्गत नाराजगी मुळे त्यांनी पक्ष सोडण्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे हिंदू बंधू भगिनींसह मुस्लिम बंधू भगिनी सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. हे प्रवेशाच्या माध्यमातून पाहण्यात आले.


                        परेश किल्लेकर यांनी भाजपात असताना अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेतले होते. त्यामुळे त्यांची मुरूड मध्ये क्रेझ खूप पाहायला मिळते. परेश किल्लेेकर यांनी भाजपा सोडल्याने मुरुड मध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे! अशी सार्वत्रिक चर्चा मुरुड मध्ये सध्या रंगली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटात प्रवेश करताच माजी मंत्री खासदार अनंत गीते यांनी त्यांना युवा सेना उपजिल्हा अध्यक्षपदी घोषणा करत. पदभार देण्यात आला. यावेळी सुरेंद्र दादा म्हात्रे रायगड जिल्हा प्रमुख, संजय मानाजी कदम दक्षिण रायगड संपर्कप्रमुख, गजानन पाटील मुरुड तालुका संपर्कप्रमुख ,नौशाद दळवी मुरुड तालुकाप्रमुख ,सुधीर धाने युवा सेना राज्य विस्तारक महाराष्ट्र आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते...

Comments

Popular posts from this blog