धाटाव पंचक्रोशी कबड्डी स्पर्धेत सोनारसिद्ध धाटाव संघ अव्वल धाटाव प्रतिनिधी -जितेंद्र जाधव

 रोहा तालुक्यातील जय हनुमान वाशी येथे सोमवार दि. ४ एप्रिल रोजी धाटाव पंचक्रोशी विभागाच्या वतीने  कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या .कै. मारुती लहाने व कै. प्रथमेश भोईर यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत  धाटाव संघाचा भरत मालुसरे यांनी  केलेल्या उकृष्ट चढाईच्या जोरावर  व अनुभवी संदेश रटाटेनी प्रेक्षणीय पकड्डीचा नमुना पेश करित अंतिम फेरीत सोनारसिद्ध धाटाव संघाने बलाढ्य जय बजरंग रोहा संघाला पराभूत केले . या स्पर्धेत एकुण सोळा संघाने सहभाग नोंदवला होता तर प्रथम क्रमांक सोनारसिद्ध धाटाव , द्वितीय क्रमांक जय बजरंग रोहा , तृतीय क्रमांक जय बजरंग लांढर तर चंतृर्थ क्रमांक  नवतरुण तळाघर पटकविला . मालिकावीर भरत मालुसरे ( धाटाव ) ,  उकृष्ट पक्कड राकेश टेंबे ( लांढर), चढाई श्रेयश कान्हेकर ( रोहा ) , पब्लिक हिरो विराज पाटील ( रोहा )  यांना सन्मानित करण्यात आले. तर प्रंशात बर्डे व विरेंद्र जंगम उत्तम समालोचन  केले. या स्पर्धे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराव मोरे ,रोहा तालुका समन्वय समिती अध्यक्ष , दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग,माजी सरपंच वाशी ग्रामपंचायत तथा रोहा समन्वय समिती सदस्य सतिश भगत ,शिवसेना धाटाव विभागीय अध्यक्ष तथा रोठ बुद्रूक ग्रामपंचायत  सरपंच नितीन वारंगे , राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष जयवंत दादा मुंढे , वरसे ग्रामपंचायत सरपंच नरेश पाटील, रामा म्हात्रे, शिवसेना  निलेश वारंगे, जगदीश भगत, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस नरेश कोकरे, धाटाव विभाग कुणबी अध्यक्ष बामुगडे भेट दिली. तर जय हनुमान वाशी ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog